Subscribe Us

header ads

किरकोळ कारणावरून व्यक्तीस जिवे मारण्याचा प्रयत्न;तीन आरोपी अजून फरार!


बीड स्पीड न्यूज 

किल्ले धारूर / प्रतिनिधी_धारूर तालुक्यातील सोनिमोहा येथे किरकोळ कारणावरून दि. १७/१०/२०२१ रोजी सकाळी ११. वा दरम्यान एका व्यक्तींस जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी अशोक तोंडे यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात बालासाहेब तुळसीराम तोंडे, तुळसीराम नामदेव तोंडे,गजराबाई तुळसीराम तोंडे,संगिता बालासाहेब तोंडे,यांच्या विरुद्ध धारूर पो.स्टेशन येथे गुन्हा विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०७,३४१,३२३,५०४,५०६,अ ३४  नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.     धारूर पोलीस ठाण्यात आरोपी बालासाहेब तुळसीराम तोंडे यास पकडण्यात आलेले आहे.तुळशीराम नामदेव तोंडे,गजराबाई तुळसीराम तोंडे,संगिता बालासाहेब तोंडे,हे तीन आरोपी अजून सुद्धा पकडलेले नाहीत.१९ तारखेला फिर्यादीनुसार यांनी किरकोळ कारणावरून भास्कर तोंडे यांना कोर्हाडी,लाता बुक्या,शिवीगाळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.या घटनेचा तपास फौजदार पालवे हे करत‌ होते.त्यांची नुकतीच बद्दली झाल्यामुळे हा तपास धारुरचे  पदावर कार्यरत असलेले पो.नि. नितीन पाटील यांच्याकडे तपास आलेला आहे.भास्कर तोंडे यांनी राहिलेले तीन आरोपी लवकरात लवकर पकडण्यात यावेत अशी मागणी प्रसिद्धि पत्रकाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा