Subscribe Us

header ads

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक



ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक

अंबाजोगाई : महाराष्ट्र शासन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व शिवाजी महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विभागस्तरीय अविष्कार रिसर्च फेस्टिव्हल २०२५ या स्पर्धेमध्ये अंबाजोगाई येथील रहिवाशी व लातूर येथील दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाची विद्यार्थीनी ऋतुजा दशरथ वेडे या विद्यार्थिनीचा विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक आला आहे. यामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.अंबाजोगाई शहरातील नवीन मोरेवाडी येथील विद्युतनगर येथे राहणारी ऋतुजा दशरथ वेडे ही विद्यार्थीनी लातूर येथील दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात पी. जी. चे शिक्षण घेत आहे. फार्मासुटीक्स (पी. जी.) गटातून अविष्कार फेस्टिव्हल २०२५ साठी इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तिने रिसर्च केले होते. या अगोदर लातूर जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये तिचा द्वितीय क्रमांक आला होता. परभणी येथील शिवाजी महाविद्यालयात झालेल्या स्पर्धेत तिने उत्कृष्ट सादरीकरण केल्याने तिचा विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन ऋतुजा वेडे या विद्यार्थिनीचा गुणगौरव करण्यात आला. या विद्यार्थिनीस विभागप्रमुख तथा असिस्टंट प्रोफेसर रोहित सारडा व असिस्टंट प्रोफेसर अर्चना येलमटे यांनी मार्गदर्शन केले. तिच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या, प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक