Subscribe Us

header ads

जुन्या प्रेम प्रकरणाचा राग मनात धरून पिंपळा देवी येथील युवकाचा खून

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

जुन्या प्रेम प्रकरणाचा राग मनात धरून पिंपळा देवी येथील युवकाचा खून





वाकनाथपुर|प्रतिनिधी-: बीड जिल्हात गुन्हेगारी वाढत चालली आहे खून दरोडा अश्या अनेक घटना घडत आहेत.अशातच बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारे पिंपळा देवी या गावातील युवकाचा खून झाल्याची घटना आज दुपारी ४ :३० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.या घटनेची माहिती अशी की पिंपळा देवी येथे राहणारा तरुण सुंदर साहेबराव कसबे (वय २२ वर्ष) या तरुणाचे गेल्या काही महिन्यांपासून माजलगाव तालुक्यातील लऊळ येथील एका तरुणीशी प्रेम समंध होते या कारणाने भांडण झाले होते. पण गावातील नागरिकांना मध्यस्थी नंतर हे प्रकरण मिटविण्यात  आले परंतु याचा राग मनात धरून तरुणीच्या काही नातेवाईकाने आज दिनांक २५ जुन वार शनिवार रोजी सुंदर कसबे हा पिंपळा देवी या फाट्यावर भेटला असता तरुणीच्या नातेवाईकाने त्याला मारहाण केली. त्याने त्यांच्या हातातुन निसटुन जाण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीच्या नातेवाईकांनी त्याचा पाठलाग करून कोणत्या तरी चाकू सारख्या तिक्ष हत्याराने वार करून सुंदर साहेबराव कसबे या तरुणाचा खून केला. खून करता वेळेस तरुणाच्या घरच्यांनी बघितले असल्याचे बोलले जाते घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे ए पी आय आघाव,पी एस आय खरात, पोलीस नाईक सवासे, हेड कॉन्स्टेबल दराडे, सानप, विघ्ने, सोनवणे, कडुळे, यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून प्रेत शव विच्छेदन करण्यासाठी बीड येथील दवाखान्यात पाठवण्यात आले आहे आरोपी सध्या फरार असुन पिंपळनेर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा