Subscribe Us

header ads

कृषी संजीवनी सप्ताहाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडा दाखवून जिल्हास्तरीय रॅली द्वारे शुभारंभ

बीड स्पीड न्यूज 



कृषी संजीवनी सप्ताहाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते
झेंडा दाखवून जिल्हास्तरीय रॅली द्वारे शुभारंभ  

बीड|प्रतिनिधी-:  दि. २५  बीड जिल्ह्यात कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते जिल्हास्तरीय रॅलीला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या 
कार्यक्रमात  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी. के. जेजुरकर, प्रगतिशील शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री. दत्ता जाधव, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ मा. के. 

एल. जगताप, कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, कृषी 
विभागाचे अधिकारी कर्मचारी, फुड टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक पी. जे. नेटके व व्हि.पी. राऊत, ॲग्रीकल्चर चे बी. बी. तायडे  विविध कृषी वितरक तसेच फुड टेक्नॉलॉजीचे व ॲग्रीकल्चर चे विद्यार्थी यांचा सहभाग होता. दिनांक २५ जून  ते दिनांक १ जुलै २०२२ या 

काळात राज्यभरात कृषि विभागातर्फे कृषि संजीवनी सप्ताह साजरा होत आहे. यादरम्यान कृषि संजीवनी मोहीम, खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्यासाठी आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषि विभागाचे अधिकारी/ कर्मचारी, जिल्हा परिषद, कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रे यांचे शास्त्रज्ञ, कृषि 

मित्र शेतकऱ्यांना बांधावर जावून मार्गदर्शन करणार कृषि संजीवनी मोहीम अंतर्गत जिल्ह्यात पुढीलप्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येणारआहेत- 25 जून विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार मूल्य साखळी बळकटीकरण दिन, 26 जून पौष्टिक तृणधान्य, 27 जून महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस, 28 जून खत बचत दिन, 29 जून प्रगतशील शेतकरी संवाद दिन, 30 जून शेती पूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस व 1 जुलै कृषि दिन या कार्यक्रमाने मोहिमेची सांगता होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा