Subscribe Us

header ads

भरधाव कारची दुचाकीला धडक दुचाकीवरील दोघे ठार

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

भरधाव कारची दुचाकीला धडक दुचाकीवरील दोघे ठार



वाकनाथपुर प्रतिनिधी-: बीड तालुक्यातील मौज येथे बऱ्याच दिवसापासून अपघाताचे सत्र सुरु आहे. आज दिनांक दिनांक २८ ऑगस्ट रोजी बीड परळी मार्गावरील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारे मौज येथे आज दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान एका कार ने दुचाकीवर सामोरा समोर धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम एच ४४ ई ९८५२ या मोटारसायकल वरून दोन तरुण बीड वरुन वडवणी कडे जात होते तर कार क्र एम एच ०४  जीडी ४६०५ वडवणी कडून बीड कडे जात होती मौज शिवारात आली असता दोन्ही वाहनाची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भयानक होती की दुचाकीवरील दोघे रामकिसन भगवान बदाडे, आणि कृष्णा सतीश बदाडे, राहणार शहाजानपुर तालुका माजलगाव हे दोन्ही तरुण जागीच ठार झाले. अपघात इतका भयानक होता की मोटार सायकल चक्काचूर झाली आहे. तर कार चे ही मोठे नुकसान झाले आहे या अपघातात कार चालक ही जखमी झाला असून स्थानिक नागरिकांनी त्याला बीड येथील खाजकी दवाखान्यात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक एपीआय आघाव यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कार ताब्यात घेउन दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांचा स्वाधीन केले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा