Subscribe Us

header ads

मातोश्री पतसंस्थेकडून ठेवीदारांची फसवणूक; संचालक मंडळासह लिपिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

बीड स्पीड न्यूज 

मातोश्री पतसंस्थेकडून ठेवीदारांची फसवणूक; संचालक मंडळासह लिपिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल 


बीड | प्रतिनिधी -: वाढीव व्याज दराने आमिष दाखवून मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्थेने ठेवीदाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल दोन कोटी पेक्षा अधिक रक्कम हडप करून पतसंस्थेला टाळे लावून फरार झाले आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात संचालक मंडळासह लिपिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ठेवीदार विद्याधर विश्वनाथ वैद्य (वय ५२ वर्ष रा.औरंगाबाद) यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वैयक्तिक त्यांची १२ लाख ९२ हजार ६४० रुपयाची फसवणुक  झाल्या प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापक योगेश विलास स्वामी यांच्यासह संचालक मंडळ पतसंस्थेतील लिपिक जयश्री दत्तात्रय मस्के यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.बीड शहरातील मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संचालक मंडळाने ठेवीदारांना १४.५० टक्के व्याजदराचे आमिष दाखवून ठेवी ठेवण्यास भाग पाडले गेल्या दोन महिन्यापासून सिद्धिविनायक संकुलनातील पतसंस्थेच्या कार्यालयाला टाळे ठोकून संचालक मंडळासह कर्मचारी फरार झाले आहेत. ठेवीदार दररोज हेलपाटे घालत असले तरी कुलूप पाहून ते परत जात होते. ठेवीदारांनी एकत्र येऊन प्रशासनाला निवेदन दिले मात्र पोलीस प्रशासन आणि सहकारी विभागातील पत्रव्यवहारात बराच कालावधी गेल्यानंतर १८ ऑगस्ट रोजी पतसंस्थेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय प्रशासक समिती आयुक्त करण्यात आली होती २५ ऑगस्ट रोजी समितीतील लेखापरीक्षक गणेश क्षीरसागर व अन्य दोन सदस्यांनी पतसंस्थेच्या कार्यालयात येऊन पदभार घेतला होता. तेथील कागदपत्राची तपासणी करण्यात आली. केवळ एकच नव्हे तर हजारो ठेवीदाराची फसवणूक झाली असून आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पतसंस्थेने हडपल्याचे सूत्राने सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा