Subscribe Us

header ads

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा

बीड स्पीड न्यूज 


भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा

कामगार भवनास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या!
       नगरसेवक अँड विकास जोगदंड 

बीड (प्रतिनिधी) 6 नोव्हेंबर अखंड भारता साठी प्रत्येक भारतीयांसाठी  विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून समता देऊन उद्धार केला.प्रत्येक क्षेत्राला विकासात्मक दर्जा देऊन समान रेषेत आणले उपेक्षित,वंचीत, कष्टकरी कामगारासाठी कामगार कायदा केला पूर्वी कामगारांकडून बारा तास काम करून घेतले जायचे परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बारा तासावरून आठ तासाचा कालवधी केला कामगारांच्या परिपूर्ण कल्यानासाठी डॉ आंबेडकरांचे अमूल्य योगदान असून त्यांचे ऋण कधीच फिटू शकत नाहीत म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील कामगार भवनाला डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार भवन असे नाव देण्यात यावे अशी मागणी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक /अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी केली आहे. सातत्याने भिम स्वराज्य संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड कामागारांसाठी कार्यरत असतात कामगारांची नोंदणी सुलभ व्हावी कामगारांच्या कल्याणसाठी असणाऱ्या योजना कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन असणे आवश्यक होते यासाठी भिम स्वराज्य संघटनेच्या वतीने मा मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले होते सदरच्या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु होता. काल महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉ सुरेशजी खाडे साहेबांनी औरंगाबाद येथे कामगार विभागाच्या आढावा बैठकीत प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन, व कामगारांना घरकुला साठी 2.50 लाख देण्याची घोषणा केल्याने महाराष्ट्रातील कामगार माता, भगिनीं, बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून मा मुख्यमंत्री व कामगार मंत्री तसेच महाराष्ट्र सरकारचे भिम स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा