पिंपळनेर :
कुक्कडगाव येथे बुधवार रात्री चोरीची घटना घडली असुन रोख रकम तसेच काजू बदाम याची चोरी झाली आहे. कुक्कडगाव येथे काही दिवसापूर्वी लाखोंची चोरीची घटना घडली होती. अद्याप त्या घटनेचा तपास लागलेला नाही आणि परत बुधवार रात्री अमोल लहू नवले यांचे गावात शिवमल्हार नावाचे किराणा दुकान आहे. रोजच्या प्रमाणे दुकानदार दुकान बंद करून गेले असता रात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून सामानाची नासधूस केली आणि दुकानातील गल्ल्यात असलेले रोख 2000 ते 3000 हजार रुपये चोरी केले. तसेच दुकानातील काजू बदाम घेऊन पोबारा केला तसेच दुसरी घटना कुक्कडगाव पासून थोड्या अंतरावर असणारे वडगाव येथील सोमनाथ राजाराम नागरगोजे यांच्या घरातील 5 ग्राम ची सोन्याची साखळी तसेच 5 ग्राम चे सोन्याचे झुंबर तसेच या गावातील चिंगुबाई यांचे 4 ग्राम चे झुंबर तसेच अन्य डाग चोरीच्या गेले आहेत. एकाच रात्री दोन गावात चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटना रात्री दोन वाजण्याच्या नंतर घडल्या असल्याचं समजते घटनेची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्यात कळवण्यात आली. महिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे श्री मेखले यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असुन पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत. कुक्कडगावं परिसरात चोरी झाल्याचे माहीत होताच परत एकदा या भागात दहशत निर्माण झाली
0 टिप्पण्या