Subscribe Us

header ads

विज वितरण कंपनीचा अनोगोंदी कारभार शेतकर्‍याचा दोन एकर ऊस जळून खाक

गेवराई_विज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे नेहमीच त्रासाला सामोरे जावे लागते. गेवराई तालुक्यातील पांढरवाडी शिवारात विजेची पार्कीग होवून तार तुटली. यामध्ये शेतकर्‍याचा दोन एकर ऊस जळाला. यात संबधीत शेतकर्‍याचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले.ज्ञानोबा दगडू माने यांचा पांढरवाडी शिवारामध्ये दोन एकर ऊस आहे. या ऊसातून विजेची तार गेली असून तार तुटून ऊसाला आग लागली. या आगीत संपूर्ण ऊस जळून गेला.ऊसासाठी शेतकर्‍यांने मोठा खर्च केला होता. ऊस तोडणीला आला होता. त्यातच आग लागल्याने तो पुर्णतः जळून गेला. यात माने यांचे मोठे नुकसान झाले. विज कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे त्याचा ऊस जळाला असल्याचे सांगण्यात येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक