Subscribe Us

header ads

हिंगणी हवेली येथे बायोडिझेल पंपावर महसूलचा छापा, पेट्रोल पंप सील

बीड_बीड औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या हिंगणी हवेली येथे अनाधिकृत सुरू असलेल्या बायो डिझेल पंपावर महसूल आणि पोलिस पथकाने दुपारी धाड टाकली असून पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे दरम्यान दुपारपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
जिल्ह्यात बायोडिझेल विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डिझेल शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे या अनाधिकृत पंपावरील स्वस्तात मिळणाऱ्या बायोडिझेलला पसंती मिळत आहे. असं असलं तरी अधिकृत पेट्रोल पंप धारकांचे नुकसान होत असल्यामुळे व बायो डिझेल विक्रीला अद्याप परवानगी नाही. त्यामुळे यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार आल्यानंतर पोलिसांनी व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करत. हिरापूर पासून जवळ असलेल्या हिंगणी हवेली येथील शेतात सुरू असलेल्या बायो डिझेल पेट्रोल पंपावर छापा मारला.ही कारवाई उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर , तहसिलदार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार संतोष राऊत,ए पी आय उबाळे , मंडळाधिकारी नितीन जाधव , तलाठी पठाण , डोळसे सचिन सानप , आणि पेट्रोलिंग कंपनीचे मॅनेजर यांच्या संयुक्त पथकाने केली. दरम्यान या कारवाईमुळे अवैद्य बायोडिझेल विक्री करणारा मध्ये खळबळ माजली असून चार वाजेपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा