Subscribe Us

header ads

अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 30 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू

गेवराई_ अज्ञात वाहनाच्या धडकेने एका 30 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहाच्या दरम्यान गेवराई तालुक्यातील गढी-माजलगाव रोडवर असलेल्या टाकळीतांडा येथे घडली. घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस घटनास्थळी डेरेदाखल झाले. या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव अशोक सखाराम माने रा.सेलू ता.गेवराई असे आहे.अशोक माने हा तरूण गढी-माजागव महामार्गावर टाकळीतांडा या ठिकाणी पायी चालत असतांना त्याला भरधाव वेगात जाणार्‍या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये तरूण जागीच ठार झाला. सदरची घटना आज पहाटे 6 वाजता ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यानूसार पोलीसांना माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने, पोलीस काँ.राऊत यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळ पंचनामा करत शवविच्छेदनासाठी मृतदेह रूग्णालयामध्ये नेला. या प्रकरणात अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा