Subscribe Us

header ads

जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणासाठी बसलेली महिला चक्क चढले झाडावर

बीड प्रतिनिधी_ पतीच्या आत्महत्येस जबाबदार अधिकार्‍यांविरोधात गुन्हा नोंद होऊन देखील कारवाई होत नसल्याने तारामती अर्जुन साळुंके  या दोन ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे उपोषणास बसल्या होत्या याबाबत सविस्तर माहिती अशी की भूसंपादनाचा मावेजा मिळत नसल्याने नैराश्यातून अर्जुन साळुंखे रा.पाली. ता. जि. बीड या इसमाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी आत्मदहनाचा प्रयत्न केला यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृत्यूनंतर उपजिल्हाधिकारी भूसंपादन कार्यकारी अभियंता पाटबंधारे उपअधीक्षक भूमी अभिलेख या उच्च अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद होऊ नये कसलीही कारवाई झाली नसल्याने तारामती अर्जुन साळुंखे रा पाली या दोन ऑक्टोबर पासून उपोषणास बसल्या होत्या 2 दिवस उलटूनही उपोषणाची दखल न घेतल्याने आज चक्क त्या झाडावर चढल्या होत्या त्यांच्या या कृत्यामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा