Subscribe Us

header ads

बीड शहरातील मूलभूत सुविधांसाठी भाजपचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले

बीड स्पीड न्यूज 

बीड शहरातील मूलभूत सुविधांसाठी भाजपचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मुख्याधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून काम करणार - सलीम जहाँगीर

बीड ( प्रतिनिधी ) शहरातील ईदगाह रोड नाळवंडी नाका किशोरी जिनिंगपर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामास तात्काळ मंजुरी मिळवून ते काम सुरू करावे , अन्य मंजूर झालेल्या सिमेंट रस्त्यांचेही काम करावे यासह मूलभूत सुविधांसंदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची भेट घेतली. विविध मूलभूत सुविधांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडण्यात आले असून त्याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी तात्काळ न.प. मुख्याधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून कामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी दिली.बीड जिल्हा भाजप नेते सलीम जहाँगीर यांच्यासह जिल्हा सरचिटणीस देविदास नागरगोजे ,भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर , शहराध्यक्ष भगिरथ बियाणी, भटके -विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.लक्ष्मण जाधव, संगीताताई धसे , अनिल चांदणे, विलास बामणे, गणेश पुजारी, सुनील मिसाळ , मुसा खान, लताताई म्हस्के, संग्राम बांगर , बालाजी पवार , दत्ता परळकर , आड्डो जहागिरदार , विरेंद्र शेळके , अम्मो शेख आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन शहरातील मूलभूत सुविधांसंदर्भात निवेदन दिले. बीड शहरातील इदगाह रोड -नाळवंडी नाका - किशोरी जिंनीग सिंमेट रस्ता तात्काळ प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळवून लवकर त्याचे काम सुरू करावे , शहरातील शासनाच्या माध्यमातून मंजुरी मिळालेल्या मात्र अद्याप सुरू नसलेल्या सिंमेट रस्ताचेही काम तातडीने सुरू करावे. भगवान बाबा प्रतिष्ठानच्या बाजूच्या बिंदुसरा नदी जवळील स्मशानभूमी मधील घाणीचे पाणी व कचरा याचे निराकरण होणे आवश्यक आहे. बीड शहरातील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट चालू करणे व दररोज नाल्या सफाई करणे आवश्यक आहे. नगर रोड वरील तिन्ही सार्वजनिक शौचालय - स्वच्छतागृहांची दैनंदिन साफ-सफाई करावी यासह अनेक मूलभूत नागरी असुविधा बाबत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व बीड शहरातील नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक उमेश ढाकणे यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी शर्मा यांनी शिष्टमंडळाच्या मागणीची दखल घेत मुख्याधिकारी ढाकणे यांना प्रत्यक्ष पाहणी करून कामे सुरू करण्याचे आदेश दिले.यावेळी  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा