Subscribe Us

header ads

बिलकिसबानो बलात्कार प्रकरणी न्याय न दिल्याने मोदी-भाजपा विरोधात बीडला झाले चले जाव आंदोलन-- ॲड. प्रा. इलियास इनामदार

बीड स्पीड न्यूज 


बिलकिसबानो बलात्कार प्रकरणी न्याय न दिल्याने मोदी-भाजपा विरोधात बीडला झाले  चले जाव आंदोलन-- ॲड. प्रा. इलियास इनामदार



बीड प्रतिनिधि: गुजरात दंगलीतल्या पीड़ितेला न्याय मिळवुन देण्यासाठी लोकसेना संघटनाने पुकारलेल्या मोदी-भाजपा चले जाव आंदोलनाला 23 ऑगस्ट पासून बीड मधून सुरुवात झालेली आहे जो पर्यंत पीड़ितेला न्याय मिळणार नाही तो पर्यंत हा आंदोलन मुक्या भैऱ्या व अंधळया मोदी भाजपा सरकार विरोधात सुरु राहणार असा इशारा लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी दिला आहे.गुजरात दंगलीत गरोदार बिलकिसबानो गँग रेप व तीन वर्षाच्या लहान मुलीसह कुटुंबातील सात सदस्यांची अमानुषपणे हत्या करणाऱ्या अकरा आरोपींची गुजरात सरकार व केंद्रीय गृह मंत्रालयाने शिक्षा माफ करुन त्यांना बरी करुन टाकले या निर्णयाचा विरोध करुन 23 ऑगस्टला लोकसेनाने जिल्हाधिकारी बीड मार्फ़त राष्ट्रपतीसह भारत सरकार व 

गुजरात सरकारला इशारा निवेदन व 26 ऑगस्टला घरावर मोटरसायकलवर काळे झेन्डे लावून निषेध नोंदवला व या घटनेतील आरोपीँची माफ करण्यात आलेली शिक्षा रद्द करावी नसता एक सप्टेंबरला मोदी-भाजपा चले जाव आंदोलन करू असा इशारा लोकसेनाने सरकारला दिलेला होता. आज एक सप्टेंबरला गुरुवारी सकाळी 11 वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात महिलांचा आदर करा, बेटी पढ़ाओ बेटी बचाओ, सबका साथ सबका विकास म्हणणारे मोदी साहेब स्वत:च्या राज्यामध्ये स्वत: नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना ज्या महिलेवर अत्याचार झाले पीड़ितेच्या डोळयासमोर 

तिच्या तीन वर्षाच्या मुलीला दगडावर आपटून ठार मारण्यात आले तिच्या परिवारातील सात लोकांची क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या पीड़ितेला पंतप्रधान असताना न्याय देतील का? मुँह मे राम और दिल मे छुरा वाली तो नीती नहीं है ना मोदीजी? म्हणून लोकसेना संघटनाने मुक्या भैऱ्या व अंधळया मोदी भाजपा सरकार विरोधात आपले आंदोलन तीव्र करुन पीड़ितेला न्याय मिळवून देण्यासाठी चले जाव आंदोलन सुरु केले हे आंदोलन जनतेच्या वतीने सुरुच राहणार व येणाऱ्या 15 सप्टेम्बर पासून गल्ली पासून दिल्ली पर्यंत महिला मोर्चे निघणार आहे व सुरुवात बीडपासून संविधान बचाव संघर्ष समिती बीडच्या वतीने देशातला पहिला मोर्चा निघेल अशी गर्जना आजच्या चले जाव आंदोलनामध्ये करण्यात आली आहे. यावेळी ॲड. प्रा. इलियास इनामदार, जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार, मिर्ज़ा खैसर बेग, अतीख अहमद खान, शेख अयाज़ अखतर,  नदीम मेंबर, मोईन मास्टर, फ़ारूक़ पटेल, शेख शफ़ीक़ भाऊ, इलियास टेलर, शेख इक़बाल, शाहेद पटेल, मूक्रमजान पठान, सादेकुज्जमा, नसीम इनामदार, मौलाना जफ़र 

काज़ी, प्रा. सविता शेटे, डॉ. गणेश ढवले, शेषेराव तांबे, अशोक हिंगे, प्रा. रफ़ीक़ बागवान, पुष्पा तुरुकमारे, शाहनवाज़ खान, शेख मोहसिन, ॲड. सय्यद साजेद, ॲड. शेख अज़ीम, मुफ़्ती वाजेद अशरफी, अय्यूब खान, शेख वज़ीर, समीर सरकार, मेजर अनुरथ वीर, खन्ना भैय्या, संतोष जोगदंड, जकेरिया सर, भैय्यासाहेब मोरे, शेख अखिल, अमजद पठान, डॉ. शेख नदीम, आफताब शेख, मिर्ज़ा अरबाज, सय्यद असद, शेख चिराग, नविद इनामदार, शेख जाफर, शेख यूनुस, शेख आखिब, शेख आमेर, जाफर इब्राहिम, शेख सोहेल, सलाम सेठ, हारून इनामदार, इलियास यूनुस, शेख जाकीर, आबेद कादरी, अमन शेख, सय्यद फारूक, शेख लाला, शेख रऊफ, बाबा भाई, सलीम खान, शेख अयाज़, शेख शप्पो इमरान जागीरदार शेख अज़हर व सर्व पक्ष-संघटनेचे नेते पदाधिकारी यांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
                                 
                   
       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा