Subscribe Us

header ads

बीड शहरात तुलसी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजला धनगर समाज वस्तीगृहास मान्यता

बीड स्पीड न्यूज 

बीड शहरात तुलसी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजला धनगर समाज वस्तीगृहास मान्यता

बीड(प्रतिनिधी):- देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ला पहिली ते बारावी इंग्रजी माध्यमासाठी खास धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय योजनेअंतर्गत दर्जेदार शिक्षण व निवासी वस्तीगृहास मान्यता मिळाली आहे. यामुळे धनगर समाजातील होतकरू गोरगरीब विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून धनगर समाजातील विद्यार्थ्यांचा शिक्षण आणि वस्तीगृहाचा प्रशन मार्गी लावण्यात यश मिळवले आहे. देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये पहिली ते पाचवी इंग्रजी माध्यमासाठी शासकीय योजनेअंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. या योजनेअंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत आरोग्य तपासणी, शासकीय गणवेश योजना, सुसज्ज व प्रशस्त इमारत, तज्ञ व अनुभवी शिक्षक, अभ्यासासाठी शांततामय वातावरण, जेवणाची उत्तम सोय व पिण्याच्या पाण्यासाठी  आर.ओ.ची व्यवस्था करण्यात आली आहे .योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे जन्मदाखला,जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड झेरॉक्स, वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (१लाख मर्यादा) हे लागणार आहे तरी जास्तीतजास्त  धनगर समाजातील पालकांनी याचा लाभ घेण्यासाठी तुलसी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, संत ज्ञानेश्वर नगर,डी.पी. रोड, बीड येथे संपर्क साधावा असे आवाहन देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा