Subscribe Us

header ads

शिव रस्ता शेजाऱ्यांनी आडवला ऊस नेण्यास अडचण, तहसीलदारांनी रस्ता उपलब्ध करुन द्यावा

बीड स्पीड न्यूज 

शिव रस्ता शेजाऱ्यांनी आडवला ऊस नेण्यास अडचण, तहसीलदारांनी रस्ता उपलब्ध करुन द्यावा

बीड प्रतिनिधी वडवणी तालुक्यातील दुकडे गांव शिवारातील शिव रस्ता एका शेतकऱ्यांने आडवला आहे. त्यामुळे ऊस घेवून जाण्यास अडचण निर्माण झाली. याबाबत तहसिलदार यांनी पर्याय काढून रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गोपीनाथ बडे सह आदिंनी वडवणी तहसिलकडे केली आहे. बापूराव देवराव पाळवदे यांनी शिव रस्ता आडवला असून रस्त्यावरून जावू देण्यास त्यांनी चक्क नकार दिला. या परिसरामध्ये गोपीनाथ बडे, शेख फकीर, शेख लाल, शेख उस्मान, बंडू नेहरकर, शेख रहीम, शेख हामजा, शेख उस्मान यांचा ऊस आहे. ऊसाला तोडणी येणार असल्याने
ऊस घेवून जाण्यास पाळवदे हा  शेतकरी विरोध करु लागला. तो जाणीवपूर्वक वाद निर्माण करुन आर्वच भाषा वापरत आहे. तरी तहसिलदार यांनी शिव रस्ता उपलब्ध करुन द्यावा व शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे तहसिलदार यांच्याकडे केली. निवेदनावर गोपीनाथ बड़े, शेख फकीर, शेख नय्युम, शेख, सय्यद, नाजर अंबील यांच्यासह आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा