Subscribe Us

header ads

ऐतिहासिक मराठावाडा मुक्ती संग्राम लढा शौर्याचे प्रतिक,नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड स्पीड न्यूज 


ऐतिहासिक मराठावाडा मुक्ती संग्राम लढा शौर्याचे प्रतिक,
नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड (प्रतिनिधी)१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यास ७५ वर्षे पूर्ण होत असून या लढ्यात अनेक वीरांनी मरणाला कवटाळून हुतात्मे पत्कारले ऐतिहासिक मराठवाडा मुक्तिसंग्राम लढा हा संबंध मानव समूहाला शौर्याची साक्ष देत राहील असे प्रखड विचार भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी भिम स्वराज्य सेनेच्या विभागीय कार्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शौर्यगाथा या कार्यक्रमाप्रसंगी मांडले पुढे सविस्तर पणे विचार मांडताना श्री जोगदंड यांनी सांगितले कि २२४ वर्षे आपल्या भागावर हैदराबादच्या निजामाची सत्ता होती. दिल्लीच्या मोगल बादशाहने आपला दक्षिणेचा सुभेदार मीर कमरुद्दीन खानाला निजाम उल मुल्क ही पदवी दिली होती. त्यामुळे त्याला निजाम म्हटले जायचे. वास्तविक पाहता २०० वर्षात एकूण सात जणांनी निजामशाहिचा कारभार केला. आणि त्या प्रत्येकाने स्वत:ला निजाम ही पदवी लावली. त्यामुळे निजाम हे कोण्या एका व्यक्तीचे नाव नसून ती एक निजामकालीन पदवी होती.१५ ऑगस्ट १९४७ म्हणजेच स्वातंत्र्यापर्यन्त भारतात निजामासारखी जवळपास ५६५ संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर बहुतेकांनी स्वत:ला भारतात विलीन करून घेतले. एक वर्ष उजाडलेतरी हैदराबादचा निजाम काही भारतात सामील व्हायला तयार नव्हता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. या प्रश्नावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपिता महात्मा गांधी, संरक्षण मंत्री सरदार वल्लभभाई पटेल, आणि विश्वश्रेष्ठ भारतीय संविधानाचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय सेना पाठवून हैदराबादच्या निजामाला शरणागती पत्करण्यास भाग पाडले रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांनी मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम नेत या लढ्याचे नेतृत्व केले.या लढ्यात अनेक क्रांतीकाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता आपले प्राण पणाला लावले अनेक स्वातंत्र्यवीर या लढ्यात पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी,बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर,मिठूलाल सारडा,झुंबरसिंह चौव्हाण,नारायणराव जोगदंड,मल्हारराव जोगदंड,शेटे अप्पा,बाबुराव वंजारे बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरजी तसेच परभणीत रझाकारांना  लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, पालम तालुक्यातील गुळखंड गावचे सुपुत्र मारोतराव पौळ , नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर सह अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी अमूल्य योगदान दिले असल्याचे नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी यावेळी सांगितले प्रथमत : हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी भिम स्वराज्य कामगार संघटनेचे मार्गदर्शक नाना मामा कदम, जिल्हा समन्वयक मंगेश जोगदंड, विष्णू गायकवाड,राजेशभाई कोकाटे,महादेव वंजारे,सचिन अप्पा जाधव,तथागत प्रतिष्ठाचे आदर्श जोगदंड,शेख अय्युब,उज्वल कोरडे,महेंद्र वंजारे,दीपक सौदा सह आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा