Subscribe Us

header ads

जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले - प्राचार्य डी.जी.निकाळजे

बीड स्पीड न्यूज 


जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले - प्राचार्य डी.जी.निकाळजे

तुलसी कॉलेज येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दीन साजरा


बीड(प्रतिनिधी):- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित्त तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे प्राचार्य डी.जी.निकाळजे यांच्या हस्ते सकाळी ०७.४५ वाजता ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी तिरंगा ध्वजाला सलामी देऊन देशाप्रती आदरभाव व्यक्त केला.प्राचार्य डी.जी.निकाळजे यांनी आपल्या मनोगतात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना सांगितली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की,आपला भारत देश जरी १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र झाला असला तरी भारतात अनेक संस्थाने होती.त्या संस्थानामध्ये हैदराबाद 

हे एक निजामाचे संस्थान होते. ते भारतात सामील होण्यास नयार नव्हते.आपला मराठवाडा हा निजामाच्या ताब्यात होता. निजामाचा सेनापती कासीम रझवी हा अत्यंत क्रूर व अन्यायी होता. त्यांची रझाकार ही संघटना सामान्य जनतेवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करत होती. या लढाईत अनेक हुतात्मांनी आपले बलिदान दिले आहे.
जे देशासाठी लढले,ते अमर हुतात्मे झाले असे भावोदगार प्राचार्य डी.जी.निकाळजे यांनी आपल्या मनोगता वेळी काढले. पुढे बोलतांना ते म्हणाले की,स्वामी रामानंद तीर्थ यांनी १९३८ मध्ये महाराष्ट्र परिषदेची स्थापना केली. हैदराबाद संस्थान भारतात सामील व्हावे म्हणून त्यांनी 

प्रयत्न सुरू केले. परंतू निजाम ऐकण्यास तयार नव्हता. वंदे मातरम् चळवळीत अनेक विद्यार्थी सामील झाले. मराठवाडा निजाम मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेवटी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी १३ सप्टेंबर १९४८ रोजी ऑपरेशन पोलो ही लष्करी कारवाई केली. या लष्करी कारवाईत निजामाचा संपूर्ण पराभव झाला. या कारवाईनंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम शरण आला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. त्यावेळी आपला मराठवाडा स्वातंत्र्य झाला असे प्राचार्य निकाळजे यांनी सांगितले.यावेळी तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालया मधील सर्व प्राध्यापक,कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा.डॉ.विकास वाघमारे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा