Subscribe Us

header ads

सकस आहार जीवनाचा आधारस्तंभ - डॉ. रुपाली लहाने मुंडे

बीड स्पीड न्यूज 


सकस आहार जीवनाचा आधारस्तंभ  - डॉ. रुपाली लहाने मुंडे


परळी वै | प्रतिनिधी -: येथील कला व वाणिज्य महाविद्यालय येथे पोषण सप्ताह समारोप संपन्न झाला यावेळी आजच्या कार्यक्रमासाठी परळी येथील श्रीलक्ष्मी डायग्नोस्टिक सेन्टरच्या डॉ. रुपाली लहाने मुंडे यांनी आपल्या भाषणात सकस आहाराचे महत्व आणि योग्य जीवनाशैली ची त्रीसूत्री सांगितली, आणि शरीरातील वेगवेगळ्या होणारे बदल आणि उपाय यावर अतिशय सहज समजेल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि कै.सौ. केशरकाकु यांच्या फोटोला हार अर्पून करण्यात आली.
गृह विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी विविध अन्न घटका विषयी बनवलेल्या पोस्टर प्रदर्शन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या या रानभाज्यांचे पोषक मूल्य आणि महत्व यांचे प्रदर्शन यावेळी गृह विज्ञान विभागाच्या वतीने करण्यात आले.याचबरोबर महाविद्यालयीन 40 विद्यार्थ्यांचे  मोफत हिमोग्लोबिन चेकअप करण्यात आले. आणि कर्यक्रमाच्या शेवटी विध्यार्थ्यांना फळे वाटण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  आणि सूत्रसंचालन गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ. वंदना फटाले यांनी केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कॅप्टन  एम. जी. राजपांगे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात  विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गृहविज्ञान विभागातील  प्रा. ज्योती मुंडे यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा