Subscribe Us

header ads

बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण सुरू असताना शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

बीड स्पीड न्यूज 


बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण सुरू असताना शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न


बीड |  प्रतिनिधी-:  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असतानाच एका शेतकऱ्याने पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी वेळीच रोखले आणि मोठा अनर्थ टळला. सुरेश शिवाजी उपाडे (वय 32, रा.  रेवली ता. परळी ) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. वडीलासह त्यांना दोन काका आहे. मात्र एका काकांच्या निधनानंतर दुसऱ्या काकाने तीन ऐवजी दोनच वारसदार दाखून वडीलोपार्जित संपत्तीतून बेदखल केल्याचा सुरेश उपाडे यांचा आरोप आहे. जमिनीच्या तीन वाटण्या समान हिस्यात  कराव्या यासाठी ते तलाठी व  तहसील कार्यालयात खेटे मारत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते मात्र न्याय न मिळाल्याने त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. आज ध्वजारोहण सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरेश उपाडे हे  हातात पेट्रोलची कॅन घेऊन आले.  पेट्रोल अंगावर ओतत  असतानाच शिवाजीनगर ठाण्याचे पो. नि. केतन राठोड,  गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच सिरसाळा ठाण्याचे अंमलदार तुषार गायकवाड, आशुतोष नाईकवाड यांनी त्यांना ताब्यात घेतले. कॅन व काडीपेटी हिसकावून घेतली. त्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर ठाण्यात नेले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा