Subscribe Us

header ads

राज्य स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी बीडचा संघ रवाना

बीड स्पीड न्यूज 

राज्य स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी बीडचा संघ रवाना

बीड | प्रतिनिधी -: महाराष्ट्र राज्याच्या कुमार गटाच्या मुला-मुलींच्या संघ निवडीसाठी राज्य अजिंक्यपद स्पर्धा दि. 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2022 रोजी सांगोला जि.सोलापुर येथे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी 18 वर्षाखालील गटात पोलीस मुख्यालय बीड येथे सराव करीत असलेले सोहम बाबर, यशपाल थोरात ,राज वाघमारे यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी कडा ता. आष्टी येथील 9 व बीड येथील 3 जणांची निवड झाली आहे. बीडचा संघ हा प्रशिक्षक सय्यद  जमीर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाला आहे . वरिल खेळाडू पोलिस मुख्यालय बीड येथे सराव करीत असुन या स्पर्धेत निवड झाल्याबद्दल सोहम बाबर, यशपाल थोरात ,राज वाघमारे यांचे  आर.पी.आय. पाटील सर , राहुल भैय्या दुबाले व सर्व पालकांनी अभिनंदन केले असुन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत या स्पर्धेतुन भिलवाडा राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धे साठी महाराष्ट्राच्या कुमार गटातील संभाव्य मुले व मुली यांची निवड करण्यात येणार आहे. सर्व बास्केटबॉल खेळाडूंना सय्यद जमीर सर, बाबर सर, अजहर सिद्दीकी, (प्रशिक्षक), गणेश सर,प्रशांत सर, सैफ सर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा