Subscribe Us

header ads

रोटरी डायलिसीस सेंटर गरजुंसाठी आधार ठरेल:डॉ.महेश कोटबागी यांचे प्रतिपादन

बीड स्पीड न्यूज 


रोटरी डायलिसीस सेंटर गरजुंसाठी आधार ठरेल:
डॉ.महेश कोटबागी यांचे प्रतिपादन

बीड ः प्रतिनिधी-: रोटरीच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. रोटरी क्लब ऑफ बीड व इतर सहयोगी क्लबच्या माध्यमातून डायलिसीस सेंटर सुरु केले जात आहे. या माध्यमातून खर्‍या गरजवंत रुग्णांसाठी आधार ठरेल. तसेच या डायलिसीस सेंटरच्या क्षमतेमध्ये वाढीसाठीही प्रयत्न करावेत असे प्रतिपादन रोटरीचे आरआयडी डॉ.महेश कोटबागी यांनी केले. बीड शहरातील नगर रोडवरील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये डायलिसीस सेंटरचे शनिवारी सायंकाळी लोकार्पण करण्यात आले. यानंतर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आयोजीत कार्यक्रमात डॉ.कोटबागी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, डीजी रुकमेश जखोटिया, पीडीजी हरिष मोटवाणी, डॉ.अनुराग पांगरीकर, डॉ.संतोष शिंदे, रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, रो.मोईन शेख, रो.सतीश शिंगटे, रो.प्रा.सुनिल जोशी, रो.वाय.जनार्धन राव, रो.क्षितीज झावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दिपप्रज्वलन व गणेशवंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक व डायलिसीस प्रोजेक्टचा परिचय प्रा.सुनिल जोशी यांनी करुन दिला. यावेळी जिल्हापरिषदेचे सीईओ अजित पवार म्हणाले, रोटरीच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. आजचा हा प्रोजेक्ट आरोग्य क्षेत्रातील अतिशय चांगला उपक्रम आहे. भविष्यात रोटरीसोबत मिळून जिल्हापरिषदेच्या माध्यमातून काम करण्यास आम्ही तयार आहोत. तसा लोकोपयोगी प्रोजेक्ट रोटरीने हाती घ्यावा आम्ही लागेल तो निधी  त्यासाठी उपलब्ध करुन देऊ असे आश्‍वासन पवार यांनी दिले. यावेळी डीजी रुकमेश जखोटिया यांनीही मार्गदर्शन केले.डॉ.महेश कोटबागी म्हणाले, रोटरीच्या माध्यमातून आजवर लोकोपयोगी उपक्रम राबवले आहेत. पुणे जिल्ह्यात आम्ही काम करतांना रांजणगाव व परिसरातील महिलांसाठी काऊ बँक सुरु केलीहोती. प्रारंभी पाचशे गायी या महिलांना देऊन त्याच्या दुध विक्रीची व्यवस्था करण्यात आली. तसेच त्या गायीची वासरे आणखी इतर महिलांना देण्यात आली. त्या पाचशे गायींपासून सुरु झालेला हा उपक्रम पाच हजारपर्यंत पोहचला आहे. तसेच या महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. शासन आणि एनजीओ यांनी मिळून केलेले काम निश्‍चितच दीर्घकाळ टीकणारे असल्याचेही डॉ.कोटबागी म्हणाले.समाजात वावरत असतांना आपण दुसर्‍याच्या उपयोगी पडण्याची भूमिका ठेवायला हवी. अगदी अपघातग्रस्तांना मदत करतांनाही पोलिसांच्या त्रासाचे कारण सांगितले जाते. परंतु ते खोटे कारण असते. अनेकदा आपण पाहतो की अपघातग्रस्त व्यक्ती हा टेम्पोमध्ये, ऑटोमध्ये अथवा साध्या एखाद्या गाडीतूनच येतो. याचा अर्थ सर्वसामान्य माणसांमध्ये माणूसकी जिवंत आहे. त्यांचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा अशी अपेक्षाही डॉ.कोटबागी यांनी व्यक्त केली.उपस्थितांचे आभार रो.कल्याण कुलकर्णी यांनी मानले. सुत्रसंचलन रोहिणी पाठक, विकास उमापुरकर, राजेश मुनोत यांनी केले.


बीडमध्ये स्कील डेव्हलपमेंट सेंटर उभारा

ग्रामीण भागातून शहराकडे विविध व्यवसाय, नोकरीसाठी धाव घेणार्‍या तरुणांची संख्या मोठी आहे. हे थांबवण्यासाठी व या तरुणांना गावातच काम देण्यासाठी स्कील डेव्हलपमेंटची गरज आहे. तात्काळ काम मिळेल असे शॉर्ट टर्म कोर्सेस या माध्यमातून सुरु करता येतील. यामुळे येथील जनतेला चांगल्या सुविधा तर मिळतीलच याबरोबरच या भागातील मुला-मुलींना याच ठिकाणी काम उपलब्ध होऊ शकेल. यासाठी जिल्हा परिषदेने जागा उपलब्ध करुन दिल्यास रोटरीकडून पुढाकार घेतला जाईल असेही डॉ.महेश कोटबागी यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा