Subscribe Us

header ads

परळी मध्ये मामाने केला धारदार शस्त्राने भाच्याचा खून

बीड स्पीड न्यूज 


परळी मध्ये मामाने केला धारदार शस्त्राने भाच्याचा खून 



परळी | प्रतिनिधी -:  कौटुंबिक वादातून मामाने चार  वर्षीय भाच्याचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना परळी तालुक्यातील नागपूर कॅम्प येथे आज रविवारी (दि. 11)  पहाटेच्या सुमारास घडली. परळी ग्रामीण पोलिसांनी मामाला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. कुमार कार्तिक विकास करंजकर (वय 04, रा. लाडेगाव ता. केज) असे त्या मयत चिमुकल्याची नाव आहे. त्याचा मामा सानिक लक्ष्मण चिमणकर (वय 27, रा. नागपूर) कुमार  कार्तिकला घेऊन त्याची आई सुरेखा विकास करंजकर हे शनिवारी माहेरी आली होती. रात्री सुरेखाने भावाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यातून नंतर बहिण-भावातच मोठा वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या सानिकने रविवारी पहाटेच्या सुमारास भाचा कुमार कार्तिकीच्या गळ्यावर आणि मानेवर धारदार शस्त्रने वार केले. कार्तिकचा आरडाओरडा ऐकून सुरेखा धावत आली. मामाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कार्तिकला घेऊन ती परळी, अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात व त्यानंतर लातूरच्या रुग्णालयात गेली परंतु कार्तिकचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर अधीक्षक कविता नेरकर,  परळी ग्रामीण ठाण्याचे प्रमुख मारुती मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.  पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा