Subscribe Us

header ads

बिंदूसरा नदी काठावर वृक्षारोपण साठी उत्साह व मोठा लोकसहभाग

बीड स्पीड न्यूज 


बिंदूसरा नदी काठावर वृक्षारोपण साठी उत्साह व मोठा लोकसहभाग

शासकीय यंत्रणा,  स्वयंसेवी  संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांचे एकत्रित प्रयत्न 

एकाच वेळी होतेय जवळपास 6 हजार वृक्षलागवड 

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सुरुवात

बीड | प्रतिनिधी -:  दि. ११::-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त बीड शहरा पासून ते बिंदुसरा धरणापर्यंत बिंदुसरा नदीच्या दोन्ही काठांवर प्रत्येकी 8 किलोमीटर अंतर लांबीच्या परिसरात जवळपास साडेचार हजार रोपांची लागवड करण्यात येत असून आज सकाळी जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करून ७:०० वाजल्यापासून सुरुवात करण्यात आलीय.मानवी साखळी पद्धतीने वृक्षारोपण करण्यात 

येत असल्याने एकाच वेळी वृक्षारोपण होत आहे. या संकल्पनेतून ४ हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्धिष्ट करण्यात आले होते . पण सर्व ठिकाणी  मिळून 5 हजार 970 एकूण वृक्षारोपण करण्यात आले होते. या मोहिमेसाठी जाणीव फाउंडेशन , क्रेडाई, इन्फंट इंडिया, रोटरी क्लब, छत्रपती शाहू प्रतिष्ठान,  आम्ही वृक्ष मित्र संघटना , वैद्यकीय व्यावसायिक संघटना, सीए असोसिएशन,  व्यापारी संघ, यासह विविध स्वयंसेवी 

संस्थांचे सदस्य , शासकीय तंत्रनिकेतन , शहरातील विविध महाविद्यालयातील एन एस एस व एन सी सी चे विद्यार्थी शासकीय अधिकारी- कर्मचारी, पत्रकार व नागरिक सहभागी झाले आहेत.जिल्हा प्रशासनाच्या वतीने १५ ऑगस्ट तसेच १७ सप्टेंबर रोजी साजरा होणारा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज ११ सप्टेंबर रोजी मोहीमेला सुरुवात करण्यात आलीय.यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य 

कार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर विभागाय वन अधिकारी सामजिक वनीकरण एम.आर.शेख यांची प्रमुख उपस्थिती होती बिंदुसरा नदीच्या दोन्ही काठांवर मिळून १६ किलोमीटर अंतर लांबीची वृक्ष लागवड करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. आज बिंदुसरा धरणा पासून ते  बीड शहरापर्यंत एकाच वेळी मानवी साखळी पद्धतीने रोपांची झाली आहे.यासह आज इन्फंट इंडिया संस्थेचे दत्ता 

बारगजे , डॉक्टर्स असोशिएशनचे डॉ. सुनिता बारकुल, डॉ. डिंप्पल ओस्तवाल, डॉ. सारिका वाघ, डॉ गणेश ढवळे देवराई संस्थाचे सदस्य, सुरेश राजहंस, बाल कल्याण समिती सदस्य, अतुल संघाणी अध्यक्ष क्रेडाई बीड. पत्रकार संजय मालाणी, बालाजी तोंडे आम्ही वृक्ष मित्र संघटना, अशोक तांगडे अध्यक्ष बाल कल्याण समिती तथा सदस्य वृक्षमित्र, रामनाथ खोड, तत्वशील कांबळे सामाजिक संस्था, अध्यक्ष राजश्री शाहू महाराज 

प्रतिष्ठाण, अध्यक्ष तिरुमला ग्रुप बीड. मिलिया महाविद्यालय बीड, सौ. के. एस. के. महाविद्यालय,  सावरकर महाविद्यालय, बलभिम महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन,  औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बंकटस्वामी महाविद्यालय, आदित्य अभियात्रिकी, डेंटल मेडीकल महाविद्यालय यांच्या प्राचार्य , प्राध्यापक व विद्यार्थी, जिल्हा सी. ए. असोशिएशन,अध्यक्ष जिल्हा व्यपारी संघटना, चंपावती प्रतिष्ठाण, अध्यक्ष जिल्हा 

वकील संघ यांचे सदस्य,  पाली सरपंच दशरथ राऊत,  ग्राम पातळीवरील कर्मचारी,  नागरिक यांचा मोठा सहभाग होता .आजच्या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी नामदेव टिकेकर उपविभागीय अधिकारी बीड,  डॉ उमेश ढाकणे  मुख्याधिकारी बीड,  सुहास हजारे तहसीलदार बीड, श्री. एस.एस.काळे वनपरिक्षेत्र अधिकारी सामजिक वनीकरण , कु.एस.एम.ससाणे वनपरिमंडल अधिकारी सामजिक वनीकरण बीड यांचा प्रमुख सहभाग होता.  महसूल, जिल्हा परिषद,  पोलिस,  विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्था सदस्य,  पत्रकार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकसहभागातून नियोजन पूर्ण केले. सामजिक वंनकर्मचारी यांनी वृक्ष लागवडीसाठी रोपांचा पुरवठा केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा