Subscribe Us

header ads

महाराष्ट्रात लहान मुलांना पळवणारी मोठी टोळी सक्रिय; बीड पोलीसांकडुन रोडवरील, लहान मुलांची तपासणी व्हावी - बाळासाहेब धुरंधरे

बीड स्पीड न्यूज 

महाराष्ट्रात लहान मुलांना पळवणारी मोठी टोळी सक्रिय; बीड पोलीसांकडुन रोडवरील, लहान मुलांची तपासणी व्हावी - बाळासाहेब धुरंधरे



बीड प्रतिनिधी : सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणाहुन लहान मुलांणा चोरलेल्या घटना समोर येत असुन महाराष्ट्रात अनेक चोरट्या टोळ्या सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत आहे. असाच एक प्रकार धाराशीव जिल्ह्यातही उघडकीस आला आहे. धाराशिव मधील एका अनाथ आश्रमामध्ये  बनावट आधारकार्ड दाखवुन लहान मुलांचे आम्ही पालक आहोत असे दाखवुन मुलांना फुस लावुन पळवणाऱ्यांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बीड जिल्ह्यातही अनेक लहान मुलं अनाथ आश्रमामध्ये व बाल सुधारगृहात आहेत अशा ठिकाणी कोणी बाहेरील लोक असेच बनावट आधार कार्ड बनवुन या लहान मुलांना पळवुन नेण्याचं प्रयत्न तर करत नाही ना हे तपासन फारच गरजेचं आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील एखाद्या अनाथ आश्रमात असा प्रकार घडला आहे का? हे तेथे भेटी दिल्यानंतरच समजेल, तेव्हाच पोलीसांना यात काही तथ्य हाती लागु शकते व ही टोळी पकडण्यास मदत मिळु शकते. मागील काही काळात बीड जिल्ह्यातली अनेक लहान मुले बेपत्ता असल्याची व चोरीला गेल्याची पोलीसांकडे तक्रारी आल्या आहेत पण अजुनही काही बेपत्ता असलेल्या मुलांचा ठाव ठिकाणा लागलेला नाही असे समजते. महाराष्ट्रातुन लहान मुलांच अपहरन करुन हे चोरटे त्या मुलांच काय करतात हा अवघड प्रशनच चोरीगेलेल्या मुलांच्या पालकांना पडलेला आहे.  त्यामुळे चोरट्या टोळ्यातींल लोकांच जाळ अजुन कुठे- कुठे पसरलेलं आहे व बीड जिल्ह्यातही अशा चोरट्यांच काही कनेक्शन आहे का.? तसेच या टोळीचा मास्टर माईंड म्होरक्या कोण, हे समजन फार गरजेचं आहे. बीड शहरातील रोडवरील पैसे मागणाऱ्या लोकांजवळील लहान मुले हे त्यांचेच आहेत का हे ही पोलीसांनी तपासणी करुन त्यांची चौकशी करणे गरजेचे बनले आहे. कारण अनेक लहान मुलांसोबत हे लोक हे निर्दयी पणे वागतांना दिसुन येतात, त्यांच्या सोबत असणारे लहान मुलांना हे लोक चक्क मच्छरात, थंडी, उन्हात, पावसात, पैसे मागण्यासाठी उभे करतात, यावरुनच यात संशय वाढवणारी बाब वाटते त्यामुळे बीड जिल्ह्यातील, व बीड शहरातील, बेवारस पैसे मागणाऱ्या लहान मुलांची व त्यांच्या सोबत असणाऱ्या मोठ्या माणसांची कसुन चौकशी करावी व शहरातील मुख्य चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे सतत चेक करुन या मुलांवर करडी नजर ठेवावी जेणेकरुन यामधुन बीड मध्ये कोणती टोळी तर नाही ना हे समोर येऊ शकते, आणी या चौकशी मध्ये एखादं लहान मुलं बेवारस किंवा पळवलेलं सापडलच तर त्या पासुन पोलीसांना मोठा सुगावा लागेल व याच चौकशी मुळे कित्येक आई बापांना आपले पोटचं हरवलेलं लेकरु परत मिळु शकते. तसे बीड पोलीस हे पहिल्यापासूनच सक्रीय व कर्तव्यनिष्ठ पध्दतीने तपास करत आलेले आहेत यात काही शंकाच नाही, त्यामुळे जनतेचे रक्षकच या चोरट्या टोळीचा लवकरच संपुर्ण पर्दाफाश करू शकतात असा लोकांना संपुर्ण विश्वास आहे. या करता रोडवर पैसे मागणारे लहान मुलांची तपासणी व्हावी व बीड बीड जिल्ह्यातील सर्वच अनाथ आश्रमातील पालक, संस्थाचालक, सदस्यांनी पोलीसांना ही या मदत कार्यात माहीती देऊन सहकार्य करावे अशी रुग्ण मित्र फांऊडेशन महाराष्ट्र चे अध्यक्ष रोहित ऊर्फ बाळासाहेब धुरंधरे यांनी प्रसार माध्यमांद्वारे विनंती केली आहे. व लवकरच आपण बीड पोलीस अधीक्षक यांना भेटुन या संदर्भात निवेदन देऊन विनंती करणार असल्याचं ही सांगितलं आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा