आ.संदिप भैय्यांच्या पाठिशी ताकद उभी करा,विकासाचे प्रश्न
प्राधान्याने सोडवतील-माजी आ.सुनिल
धांडे
नाळवंडी सर्कलमध्ये सव्वा तीन कोटींच्या कामाचे
उद्घाटन
बीड (प्रतिनिधी):- अडचणीच्या काळात जनतेने आशिर्वाद दिले,
सर्वसामान्य माणसाने संभाळलं म्हणून आमदार झालो.
गेल्या 25 वर्षाच्या काळातील विकासाचा
बॅकलॉक भरून काढेल, आपले आशिर्वाद पाठिशी
राहु द्या. नाळवंडी सर्कलमधील वांगी येथील 3 कोटी रूपयांच्या विकास कामांचे भुमिपूजन होत आहे. ही कामे दर्जेदार
झाली पाहिजेत अशा सूचना ही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी यावेळी दिल्या. आ.संदिप
भैय्यांच्या पाठिशी विकासाच्या बळावर ताकद उभी करा, या भागाचे प्रश्न प्राधान्याने सोडवतील असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानावरून माजी आ.सुनिल धांडे यांनी बोलतांना केले.
सोमवार दि.12 जुलै रोजी नाळवंडी
जि.प.गटातील वांगी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत प्रजिमा 51 ते वांगी जाधववस्ती, वांगी ते बजगुडेवस्ती, वांगी ते शेलारवस्ती या सहा कि.मी.रस्ता सुधारणा 3 कोटी 4 लाख रूपये कामाचे भूमिपुजन करण्यात आले. तर 5 लक्ष रूपयाच्या गावांतर्गत सिमेंट रस्त्याच्या उद्घाटन,
3 लक्ष रूपयांच्या सौर पथ दिव्याचे लोकार्पण,
4 लक्ष रूपयांच्या खुल्या व्यायाम शाळेचे लोकार्पण
व इतर 10 लक्ष रूपयांच्या विकास कामाचे
उद्घाटन आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी माजी आ.सुनिल धांडे हे होते तर माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अॅड.डी.बी.बागल,
स्वमी अखण्डन्दगिरी महाराज, जीवनराव बजगुडे, कल्याण काका आखाडे, भाऊसाहेब डावकर, बबनराव गवते,
उत्तरेश्वर सोनवणे, कांता शिंदे, बाळासाहेब गुजर, शैलेश जाधव,
प्रकाश ठाकुर, नंदकुमार कुटे, राधाकिसन म्हेत्रे, दिपक हजारे,
पंकज बाहेगव्हाणकर, दादासाहेब लांडे, आप्पा कदम, दिलीप वाणी,
अनिल आमटे, मनोज बेद्रे, सुग्रीव मुंडे, राम जाधव,
मधुकर डाके, चौरंगनाथ पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना
माजी आ.सय्यद सलीम म्हणाले की, आ.संदिप भैय्यांच्या
माध्यमातून बीड मतदार संघातील विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. आलेला निधी
ग्रामीण व शहरी भागाच्या विकासात भर पडेल. बीड ते खापरपांगरी रस्त्यासाठी सीआरएफमधुन
9 कोटी, अंबिका चौक ते करपरा नदी अर्थसंकल्पीय निधी 6 कोटी, बीड-इमामपुर रस्त्यासाठी 10 कोटी रूपये यासह
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आ.संदिप भैय्या क्षीरसागर निधी खेचून आणत आहेत.
विकास झाला पाहिजे यासाठी त्यांचे प्रयत्न असून टप्प्या टप्यात सर्व प्रश्न मार्गी
लागतील असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. चलता-फिरता जनता गाडी म्हणजे आ.संदिप
भैय्या क्षीरसागर आहेत. कुठेही थांबतात, उभे राहतात, लोकांचे प्रश्न सोडवतात,
खर्या अर्थाने मोठ्या प्रमाणात निधी खेचुन आणतात.
त्यांच्या पाठिशी ताकद उभी करा, सरकारच्या माध्यमातून
व पक्षाच्या माध्यमातून बीड मतदार संघाचा विकास करतील असा विश्वासही यावेळी त्यांनी
व्यक्त केला. दिलेल्या वचनांची पुर्तता आ.संदिप भैय्या करत असून येणार्या काळात निवडणुका
आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि
आ.संदिप भैय्यांची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करा. विकासाचे प्रश्न आ.संदिप भैय्या
सोडवतील. याही पुढे नाळवंडी सर्कलमधील विकासाच्या प्रश्नासाठी आ.संदिप भैय्या अधिकचा
निधी देतील असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डी.बी.बागल यांनी केले. कार्यक्रमाचे
उद्घाटन झाल्यानंतर बोलतांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर म्हणाले की, कोरोनाच्या काळात जी सेवा करता येईल जनतेची ती करत
आलो आहे. कुटुंब आजारी असतांना जनतेच्या सेवेला प्राधान्य दिलं. तिसरी लाट येईल असे
सांगितल्या जाते, याची दक्षता घेवून
जनतेने काळजी घ्यावी. जो 25 वर्षाच्या काळात
विकास झाला नाही तो विकास करण्यासाठी मी प्रयत्नशिल राहिल. वांगी व परिसरातील विकासासाठी
कुठे कमी पडणार नाही. तलावाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. बीडमध्ये 200 खाटांचे नवीन रूग्णालयही उभारत आहोत. शहरातील मुख्य
रस्त्याचाही प्रश्न लवकरच मार्गी लागत आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून
विकास कामांचा वेग वाढवु, गाठी भेटींचाही वेग
वाढेल असा विश्वास यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिला. तर अनेक वेळा आम्ही
बोलून थकलोत, निवेदने देवून थकलोत परंतू
कोणीच प्रश्न मार्गी लावला नाही. परंतू आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी प्रश्न मार्गी
लावून थेट विकास कामांचं नारळच फोडलं. याबद्दल गावकर्यांच्या वतीने जीवनराव बजगुडे
यांनी व सरपंच हाडुळे यांनी आ.संदिप भैय्यांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
बालाभाऊ शेळके, रायचंद जाधव,
हरिभाऊ शेळके, प्रकाश हाडुळे, आंबादास शेळके, रतन शेळके,
गोरख शेळके, रामहारी हाडुळे, भगवानराव शेळके यांसह वांगी येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
खुल्या व्यायाम शाळेचे लोकार्पण
आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून तरूणांना व्यायमाचे
महत्त्व पटले पाहिजे. त्यांना साधने उपलब्ध झाली पाहिजेत यासाठी आ.संदिप भैय्यांनी
मतदार संघातील जवळपास प्रत्येक गावात खुली व्यायाम शाळा उभारली आहे. या वांगी येथील
खुल्या व्यायाम शाळेचे लोकार्पण झाल्यानंतर व्यायाम करण्याचा मोह आ.संदिप भैय्या क्षीरसागर
व माजी आ.सुनिल धांडे यांना आवरता आला नाही.
आ.संदिप भैय्यांच्या माध्यमातून बीड मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणात निधी-माजी आ.सय्यद सलीम
वांगी येथील 3 कोटी व इतर विकास कामांचे भूमिपुजन होत आहे. याबरोबरच आ.संदिप भैय्यांच्या माध्यमातून
बीड ते खापरपांगरी रस्ता सीआरएफमधून 9 कोटी, अंबिका चौक ते करपरा नदी 6
कोटी रूपये, पोलीस मैदानाच्याबाजुचा पुल 3 कोटी रूपये, बार्शी नाका ते इमामपुर
रस्ता 10 कोटी रूपये, नॅशनल हायवे अंतर्गत शहरातील मुख्य रस्ता 16
कोटी अशा शासनाच्या विविध योजनांमधुन आ.संदिप भैय्यांच्या
माध्यमातून बीड मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. ही कामे लवकरच सुरू होतील
असेही यावेळी माजी आ.सय्यद सलीम यांनी सांगितले.
0 टिप्पण्या