Subscribe Us

header ads

जयदत्त अण्णा,क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ भारतभुषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांसाठी पतसंस्था स्थापन करणार -- अँड विकासजी जोगदंड

बीड (प्रतिनिधी) 21 जुलै कष्टकरी कामगार श्रमिकांच्या सर्वोतपरी कल्याणा साठी कामगार कल्याण मंडळाच्या अनेक योजना असुन या योजना तळागळातील कष्टकऱ्या पर्यंत पोहचविण्यासाठी भिम स्वराज्य कामगार संघटना प्रमाण पणे कार्यरत असुन येणाऱ्या काळात कामगारांनी संघटीत होऊन  सहकारातून समृद्धी साधण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आपण प्रयत्न शील असुन लोकनेते जयदत्त क्षीरसागर,नगराध्यक्ष डॉ भारतभुषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मराठवाढ्यातील पहिली कामगार पतसंस्था स्थापन करणार असल्याचे आज रोजी भिम स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने आयोजित कामगार सुरक्षा साहित्य वाटप कार्यक्रमा प्रसंगी *भिम स्वराज्य संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी उपस्थितांना संबोधित करतानां सांगितले* टाळेबंदी च्या काळात अनेक कामगारांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन कर्जबाजारपणाला बळी पडले भविष्यातील संकट ओळखून कामगारांना आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ येऊ नये यासाठी कामगारांसाठी पत संस्थे ची आवश्यकता आहे त्या दृष्टीने आता आपण कार्य करणार असल्याचे ही विकास जोगदंड यांनी सांगितले
सदरचा कार्यक्रम विजय पोकळे यांच्या उपस्थितीत पार पडला
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटनेचे जिल्हा समन्वयक मंगेश जोगदंड यांनी केले यावेळी महादेव वंजारे,आकाश गायकवाड, वैभव पोकळे,कामगार मंडळाचे स्वामी, आदर्श जोगदंड,आदित्य जोगदंड, सह कामगार महिला भगिनीं,बांधव मोठया संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा