Subscribe Us

header ads

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बस स्थानकातील प्रवाशांना मास्क व सॅनिटायझर वाटप

कोरोना संसर्ग नियमांचे पालन करणे सर्व नागरिकांचे कर्तव्य-आगारप्रमुख प्रविण भोंडवे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जागावरील मोठे संकट हे कोरोना असुन या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे मनोगत मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ना.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित मास्क व सॅनिटायझर वाटप कार्यक्रमात परळी बस स्थानकाचे आगार प्रमुख प्रवीण भोंडवे यांनी व्यक केले.
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवस हा परळी वैजनाथ येथे सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत असून शुक्रवार दिनांक 30 जुलै रोजी शिवसेना, भारतीय विद्यार्थी सेना, एस.टी.कामगार सेना यांच्या वतीने बस स्थानकातील चालक व वाहक यांना सॅनिटायझर तर प्रत्येक प्रवाशाला मास्क वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम शिवसेना बीड जिल्हा उप प्रमुख तथा बीड जिल्हा नियोजन समिती सदस्य अभयकुमार ठक्कर,परळी बस स्थानकाचे आगार प्रमुख प्रवीण भोंडवे,भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे,शिवसेना मा.उपशहर प्रमुख सतिष जगताप अंबेजोगाईचे माजी नगरसेवक भागवत लाके,बस स्थानकाचे नियंत्रक बिडवे साहेब यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.उपशहर प्रमुख सचिन स्वामी प्रस्ताविक सतिष जगताप यांनी केले तर आभार शहर संघटक संजय कुकडे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना विभाग प्रमुख संजय सोमाणे,उप शहर प्रमुख किशन बुंदेले,भारतीय विद्यार्थी सेना तालुका समन्वयक अमित कचरे, शहर प्रमुख गजानन कोकीळ, दिपक जोशी एस.टी.कामगार सेनेचे मोहन गित्ते, दयानंद गित्ते, भरत ननावरे, प्रदीप सावंत, विष्णू सातभाई,महारुद्र घाडगे, राजकुमार फड, शिवदायल शर्मा,मनीष जोशी,योगेश घेवारे,लक्ष्मण मुंडे यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा