Subscribe Us

header ads

आ.संदिप क्षीरसागरांच्या प्रयत्नातून अंथरवणपिंप्री-खांडेपारगाव रस्त्याचे काम सुरू होणार

आज मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपुजन


बीड (प्रतिनिधी):- आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासाला चालणा मिळू लागली आहे. गेल्या तीस वर्षाच्या काळात जी विकास कामे होवू शकली नाहीत ती विकास कामे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून पुर्ण होत असतांना दिसून येत आहेत. रामा 55 ते अंथरवणपिंप्री 3 कि.मी. रस्ता सुधारणा काम 1 कोटी 85 लक्ष रूपये निधी, रामा 55 ते खांडेपारगाव रस्ता सुधारणा 3 कि.मी. 1 कोटी 42 लक्ष अशा एकूण 3 कोटी 27 लक्ष रूपयाच्या रस्ता कामाचे भूमिपुजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, अ‍ॅड.डी.बी.बागल यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड यांच्यामार्फत रामा 55 ते अंथरवणपिंप्री रस्ता सुधारणा, रामा 55 ते खांडेपारगाव रस्ता सुधारणा या रस्ता कामाचे भूमिपुजन आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या उपस्थितीत माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल यांच्या उपस्थितीमध्ये आज शुक्रवार दि.6 ऑगस्ट रोजी होणार आहे. यावेळी अंथरवणपिंप्री, खांडे पारगाव येथील बहिरवाडी सर्कलमधील कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पॉलिटेक्निक कॉलेज येथून मोटर सायकल रॅलीने अंथरवणपिंप्री येथील रस्ता कामाचे भूमिपुजन, खांडे पारगाव येथील रस्त्याचे भूमिपुजन मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अंथरवणपिंप्री व खांडे पारगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा