Subscribe Us

header ads

बीड येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याने केली मारहाण.

बीड-: बीड येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याने  कार्यालयातच मारहाण केल्याची घटना 14 ऑगस्ट रोजी घडल्याची माहिती समोर आली होती. घाबरलेल्या महिलेने याबाबत विभागीय नियंत्रकांकडे लेखी तक्रार केली आहे. या अगोदरही पीडित कर्मचाऱ्याला या अधिकाऱ्याकडून वारंवार छेडछाड होत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तसेच वाईट हेतूने पाहत असल्याचे देखील पीडित कर्मचाऱ्याने सांगितले. सांगताना महिला ढसढसा रडली. या घटनेनंतर एसटी महामंडळात खळबळ उडाली असून या बाबत अधिकाऱ्याला फोनवरून विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.विभागीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वीही साधारण दोन वर्षांपूर्वी एका अधिकाऱ्याने आपल्याच विभागातील महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत शरीर सुखाची मागणी केली होती. याची तक्रार केल्यानंतर दक्षता समितीने चौकशी केली. यात दोषी आढळल्याने संबंधित अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला होता. ही घटना विसरण्यापूर्वीच आता लेखा विभागात नवीन घटना घडली आहे.अविवाहित महिला कर्मचारी काम करत असताना तिला प्रभारी लेखापाल नारायण मुंडे यांनी वाईट हेतून स्पर्श केला. यावर ती रागावून वरिष्ठांकडे तक्रार देण्यास जाताना तिला पायऱ्यांवर अडवून मुंडे यांनी मारहाण केली. तसेच नोकरी घालविण्याची धमकी दिल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.त्यानंतर 15 ऑगस्ट रोजीही धमकावल्याचा प्रकार घडला होता. पीडित महिला कर्मचारी विभागीय नियंत्रक अजय मोरे यांच्याकडे तक्रार घेऊन गेली. यावर तिला डेपोत बदली करतो, नाहीतर आणखी त्रास सहन कर, असे उत्तर दिल्याचे पीडिता सांगते. या प्रकारावरून मोरे यांच्याकडूनही अधिकाऱ्याला अभय असल्याचा आरोप पीडितेने केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा