Subscribe Us

header ads

अंबाजोगाईत धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खुन

अंबाजोगाई-: वराह चोरल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून वादावादी झाल्यानंतर मंगळवारी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान एका 30 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राचे वार करून खून केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील वडारवाडा परिसरात घडली असून यावेळी झालेल्या मारामारीत अन्य दोघेजणही जखमी झाले आहेत.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अंबाजोगाई शहरातील वडारवाडा परिसरात राहणारे काही लोक वराह पालनाचा व्यवसाय करतात. रवी धोत्रे (वय 30) हा तरुण देखील वराह पालन करत होता. परंतू त्याची वराह काही तरुणांनी चोरले असल्याची माहिती रविला मिळाल्यानंतर रविने संशयीताच्या घरी जावून आमची वराह का चोरली असा जाब विचारला. यावेळी शाब्दीक बाचाबाची देखील झाली. याच बाचाबाचीचे रूपांतर पुढे मोठ्या भांडणात झाले. रवी हा घरी आलेला असताना मोटार सायकलवरून आलेल्या लोकांनी आम्ही वराह चोरले नाही, तुम्ही आमच्या माणसांना का बोलता अशी आशयाची चर्चा झाली आणि पुन्हा शाब्दिक बाचाबाचीला सुरुवात झाली. यावेळी एका तरुणाने आपल्या हातातील धारदार शस्त्राने रवी धोत्रे याच्यावर सपासप वार केले. दुपारच्या वेळेला पाऊस सुरू असल्या बहुतेकजण घरातच असताना रस्त्यावर मात्र हा जीवघेणा प्रकार सुरू होता. रस्त्यावरचा हा प्रकार रवी धोत्रेच्या नातेवाईकांना सजल्यानंतर ते देखील घराबाहेर पडले यावेळी पुन्हा मारामारीला सुरुवात झाली. या मारामारीत धोत्रे याला मारण्यासाठी आलेल्या लोकांपैकी दोघाजणांना मार लागला. घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून सर्व जखमींना स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतू रवी धोत्रे याचा मात्र या मारहाणीमध्ये धारदार शस्त्राचे वार लागून मृत्यू झाला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा