Subscribe Us

header ads

टुकुर साठवण तलाव ऐवजी ४ निम्न पातळी बंधारे मंजूर करून काम तातडीने हाती घ्यावे आ. संदीप क्षीरसागर यांच्या मागणीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी समर्थन देत कार्यवाही करण्याच्या दिल्या सूचना

कोणत्याच गावाला येणार नाही बाधा,जमीन भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही


बीड, (प्रतिनिधी):- बीड विधानसभा मतदारसंघातील खांडेपारगाव येथे साठवण तलाव टुकूर प्रकल्पाच्या निमित्त मुंबई मंत्रालय येथे आ. संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली.  यावेळी त्यांनी खांडे पारगाव टुकुर साठवण तलाव ऐवजी ४ निम्न पातळी बंधारे मंजूर करून काम तातडीने सुरू करावे अशी आग्रही मागणी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे  केली. ४ निम्न पातळी बंधारे केल्यास स्थानिक गावकऱ्यांचा प्रकल्पास असणारा विरोध देखील नाहीसा होईल तसेच या प्रकल्पामुळे आपले नुकसान होण्याची जी भीती स्थानिक गावकऱ्यांना आहे ती देखील पूर्णपणे संपेल. कुठल्याही गावाला भुसंपादन करण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाला ही बाधा न येऊ देता हा प्रकल्प पूर्ण व्हावा अशी भूमिका यावेळी आ. संदीप क्षीरसागर यांनी  व्यक्त केली.
 बीड मतदार संघातील खांडेपारगाव येथे साठवण तलाव टुकूर प्रकल्पाच्या निमीत्तने मुंबई मंत्रालय येथे राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांची आ.संदीप क्षीरसागर यांनी भेट घेतल्यानंतर आ. संदीप क्षीरसागर यांच्या भूमिकेला समर्थन देत मंत्री महोदयांनी देखील याबाबत लवकर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.यावेळी  राज्यमंत्री ना.संजय बनसोडे, ना. प्राजक्त तनपुरे, माजी आमदार सय्यद सलीम, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदी उपस्थित होते.


शेतकऱ्यांना मोठा मिळेल आधार, सिंचन क्षेत्र वाढेल
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या टुकर प्रकल्पास स्थानिक शेतकरी यांचा विरोध आहे,परंतु ४ निम्न पातळी बंधारे केल्यास स्थानिक गावकऱ्यांचा प्रकल्पास असणारा विरोध देखील नाहीसा होईल तसेच या प्रकल्पामुळे आपले नुकसान होण्याची जी भीती स्थानिक गावकऱ्यांना आहे ती देखील पूर्णपणे संपेल. कुठल्याही गावाला भुसंपादन करण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाला ही बाधा न येऊ देता हा प्रकल्प पूर्ण व्हावा अशी भूमिका आ संदीप क्षीरसागर यांनी घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून सिंचन क्षेत्र  वाढणार असल्याचे दिसते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा