Subscribe Us

header ads

मनरेगा घोटाळ्यातील दोषींवर होणार कारवाई- फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पाटील

बीड-: बीड जिल्ह्यात झालेल्या मनरेगा गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असा इशारा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पाटील यांनी दिला आहे.त्यांनी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत नरेगाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच, घोटाळ्यासंदर्भात कारवाईच्या सूचना देखील प्रशासनाला दिल्या आहेत. यावेळी पत्रकारांनी बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या गावातील घोटाळ्या संदर्भात प्रश्न विचारला असता.. माझ्याकडे तक्रार आलेली नाही शासन आम्हीच आहोत. दोषी असेल तर कारवाई होणार, मग तो कोणीही असो, असे उत्तर दिले.बीड जिल्ह्यात नरेगाच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचे सांगत जिल्हाधिकारी यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर, आता राज्य सरकारला जाग आली आहे. रोहयो मंत्र्यांनी बीड जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन, कामासंदर्भात माहिती घेतली. दोषींवर कारवाई केली जाईल, असं सूचक वक्तव्य केल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.(2011 ते 2019) या आठ नऊ वर्षात बीड जिल्ह्यात रोजगार हमी योजना अर्थात नरेगा अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहेत. या संदर्भात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात, याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना जिल्हाधिकारी न्यायालयाला योग्य माहिती देत नाहीत म्हणून जिल्हाधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले होते.यानंतर बीड जिल्ह्यात नरेगा घोटाळा हा विषय चर्चेला आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारला जागा आली असून रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी आज बीड जिल्हा दौऱ्यावर येत रोहयोच्या कामाची पाहणी करत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांना कारवाईच्या अनुषंगाने सूचना दिले. तसेच नरेगाच्या रखडलेल्या कामासंदर्भात व शेतकऱ्यांच्या थकित बिलासंदर्भात देखील जिल्हा प्रशासनाला सूचना दिले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा