Subscribe Us

header ads

पालीत साकारतोय वनविभागाचा 'युवा शांतीवन' हा आकर्षक पर्यटन प्रकल्प!युवा शांतीवनच्या विकासासाठी आवश्यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध करून देऊ - धनंजय मुंडे

पाली येथील वन विभागाच्या युवा शांतीवन या पर्यटन स्थळास ना. धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर यांनी दिली भेट

बीड (दि. 15) ----- : बीड शहरापासून जवळच असलेल्या पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाला लागून असलेल्या डोंगर परिसरात वन विभागाच्या वतीने युवा शांतीवन हा आकर्षक पर्यटन प्रकल्प साकारत आहे. या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चिल्ड्रेन पार्क सह विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यासाठी वनविभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.ना. धनंजय मुंडे यांनी आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांच्यासह याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तलावाच्या किनाऱ्यालगत उभारण्यात येत असलेल्या जेट्टी, रस्त्यातील ग्रीन कॅनॉपी, कॅफेटेरिया, व्हिव्युअर्स पॉईंट आदी ठिकाणी पाहणी करत ना. मुंडेंनी माहिती घेतली. ग्रीन कॅनॉपी वर विविध वेली सोडण्यात येणार आहेत. तसेच पाहणी स्थळावर (viewers point) सुशोभीकरण व भिंतींवर विविध प्राण्यांची चित्रे काढण्यात येत आहेत.लहान मुलांसाठी चिल्ड्रेन्स पार्क, ओपन जिम आदी कामांचीही आता पुर्णत्वाकडे वाटचाल सुरू असून, 90% पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. कोरोनाविषयक निर्बंध हटवल्यानंतर लवकरच हा पार्क सामान्य बिडकरांसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी दिली.रम्यान या पर्यटन स्थळी बोटिंगची व्यवस्था देखील उपलब्ध आहे, मात्र बिंदुसरा प्रकल्पातील पाणी बिडकर पिण्यासाठी वापरतात, त्यामुळे येथे बोटिंगला परवानगी नाही, अशी माहिती आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा