Subscribe Us

header ads

T20 World Cup : पहिल्याच सामन्यात भारत पाकिस्तान आमने सामने आयसीसीकडून वेळापत्रकाची घोषणा

यंदा होणारा टी-२० वर्ल्डकप ओमान आणि यूएईमध्ये खेळवला जाणार आहे.

आयसीसीने या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. करोना विषाणूमुळे, भारतात होणारी ही स्पर्धा आता ओमान आणि यूएईमध्ये आयोजित केली जात आहे. टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. जेतेपदाचा सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारत २४ ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्याचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होईल.
टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे गट आधीच जाहीर झाले आहेत. पहिल्या फेरीत ८ संघ सुपर १२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळतील. आयर्लंड, नेदरलँड्स, श्रीलंका आणि नामिबियाला अ गटात, तर ओमान, पीएनजी, स्कॉटलंड आणि बांगलादेशला ब गटात स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील फक्त अव्वल दोन संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा