Subscribe Us

header ads

मयत वडिलांची बनावट सही करून मुलाने बँकेतून उचलले 65 लाख रुपये

परळी-:मयत असलेल्या वडिलांची चेक वर बनावट सही करून महाराष्ट्र बँकेतील त्यांच्या खात्यावर असलेली 65 लाख 92 हजार रुपयांची रक्कम काढून स्वतःच्या खात्यात जमा करण्याचा प्रकार परळीत उघडकीस आला. या प्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.परळी शहरातील मल्लीकपुरा भागात राहणार्‍या कमरबेगम अब्दुल रौफ (वय 60) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा अब्दुल रहीम अब्दुल रौफ ( वय 37) याने वडील मयत असताना चेक वर त्यांच्या बनावट सह्या करून महाराष्ट्र बँकेतील 65 लाख 92 हजार रुपये स्वतःच्या खात्यात जमा केले.याबाबत विचारणा केली असता त्याने आईला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलगा अब्दुल रहिम अब्दुल रौफ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा