बीड (प्रतिनिधी) 20 सप्टेंबर *पिढ्या न पिढ्या सर्वच स्तरातून मागासलेल्या अनुसूचित जाती,जमाती साठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन विकासात्मक तरतूद केली डॉ आंबेडकरांनी सर्वच घटकानां सर्व भारतीयांना न्याय दिला परंतु शिव,फुले,शाहु,आंबेडकर,साठे या महामानवांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ओठात एक आणि पोटात एक अशी कपट निती असणारे राज्यकर्ते जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा मागासवर्गीयांच्या विकासात्मक धोरणाला हरताळ फासण्याचे कुटील कारस्थान करतात तेंव्हा त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येऊन अश्या वृत्तीच्या विरोधात बंड केले पाहिजे असे आव्हान भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी बीड,केज, आंबेजोगाई,लातूर, या ठिकाणी भिम स्वराज्य सेनेच्या आयोजित संपर्क अभियान दरम्यान केले*
*यावेळी पुढे बोलतानां अँड विकास जोगदंड म्हणाले कि गेल्या दहा वर्षापासुन तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री तथा बीड चे पालकमंत्री धंनजय मुंडे हे आमदार,व विरोधी पक्ष नेते असतानां वारंवार सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या योजनेत ढवळा ढवळ करत योजना बंद पाडण्यासाठी पुढाकार घेत मागासवर्गीय विरोधी भूमिका घेऊन सामाजिक न्याय मंत्री म्हणून सुत्र हाती घेताच महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ,संत रोहिदास महामंडळ,सह समाज कल्याण विभाग अंतर्गत अनुसूचित जाती,जमाती च्या औद्योगिक सहकारी संस्थानां मिळणारे अर्थ सहाय्य च्या योजना गुंडाळ्या असुन सर्वच महामंडळास टाळे लावून अनु जाती, जमातीतील होतकरू नव उद्योजकानां आर्थिक विवेचनात ढकलण्याचे महापाप करत मागासवर्गींयांवर एक प्रकारे अन्याय करत सुड उगारत असुन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनेला लागलेले ग्रहण असुन महामंडळास भरीव निधी मिळावा या करीता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार असल्याचे ही यावेळी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी सांगितले*
याप्रसंगी राजेशभाई कोकाटे,मंगेश जोगदंड,दिपक सौदा,महादेव वंजारे,बबन जोगदंड,गोरख जोगदंड, विष्णु गायकवाड सह आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या