Subscribe Us

header ads

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी

मुंबई_येत्या ४ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातून रजनी पाटील यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी सोमवारी पाटील यांच्या नावाची घोषणा केली. राजीव सातव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. रजनी पाटील या काँग्रेसच्या जम्मू काश्मीरच्या प्रभारी आहेत.काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची मुदत २२ सप्टेंबरला संपणार आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा होती. राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासह राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, मुकूल वासनिक, संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा होती. अखेर काँग्रेसने रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. जागेवर काँग्रेसकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या रिक्त जागेसाठी काँग्रेसकडून मुकूल वासनिक, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव आणि मिलिंद देवरा यांच्या नावांचीही चर्चा होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा