Subscribe Us

header ads

गेवराई पोलिसांची मोठी कारवाई चोरीच्या नऊ मोटरसायकल केले जप्त




गेवराई-:बीड जिल्हात मोटारसायकल चोराने थैमान घातले आहे.रोज कोठेना कोठे मोटासायकल चोरीच्या घटना घडतच आहेत.पोलीस प्रशासन ने अनेक मोटासायकल चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.तरीही मोटरसायल चोर कमी होत नाहित.गेवराई पोलिसांना एका खबऱ्याकडून  माहिती मिळाली की उमापूर परिसरात एका व्यक्ती कडे चोरीच्या मोटासायकल आहे. अशी माहिती गेवराई पोलीस ठाण्याचे डीपी पथक चे प्रमुख प्रफुल्ल साबळे  यांना मिळाली यानंतर लगेच त्यांनी आपल्या टीमला सोबत घेऊन उमापूर परिसरातून या आरोपीला  ताब्यात घेतले किरण तात्यासाहेब कोल्हारे वय (२६) वर्ष रा भांबेरी तालुका अंबड जि. जालना ह .मु देवपिंप्री ता गेवराई याला अटक केली आहे.आरोपी किरण याची चौकशी केली असता त्याने मोटासायकल चोरल्याची कबूली दिली. तपासादरम्यान आरोपी कडून वेगवेगळ्या कंपनीच्या नऊ मोटारसायकल अंदाजे चार लाख रुपयाचामुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा व पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली डिपी पथक प्रमुख एपीआय प्रफुल्ल साबळे. स. फौ उबाळे. पो. हे. काँ देशमुख. पो.कॉ.जायभाय. पो काँ. काळे. यांनी केली असून या घटनेचा
अधिक तपास हे पथक करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा