Subscribe Us

header ads

अतिवृष्टी, कर्जबाजारी पणा ने तरूण शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

चार दिवसापूर्वी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हेरावून घेतल्याने शेतकर्‍यात नैराश्य निर्माण होत आहे. शेती पिकाचं झालेलं नुकसान आणि डोक्यावरच कर्ज या चिंतेतून एका तरूण शेतकर्‍याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही मारफळा येथे घडली. घटनेची माहिती तलवाडा पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला.विलास लक्ष्मण माने (वय 26) हा शेतकरी अल्पभूधारक आहे. याने आपल्या शेतामध्ये कापसाची लागवड केली होती. गेल्या चार दिवसापूर्वी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे विलास माने यांच्या पीकाचे पुर्णत: नुकसान झाले. माने यांनी या पीकावरच आशा ठेवली होती.त्यातच पावसामुळे त्यांच्या आशेची निराशा झाली. त्यांच्याकडे खासगी लोक आणि बँकेचे कर्ज होते. पीकच आले नाही तर बँकेचं कर्ज कसं फेडायचं या चिंतेत हा शेतकरी होता. रात्री त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. हा आत्महत्येचा प्रकार सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती तलवाडा पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी मारफळा येथे येवून पंचनामा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा