Subscribe Us

header ads

बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहवे

बीड (प्रतिनिधी):-  बीड जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असून जिल्ह्यातील लहान मोठे जवळपास सर्वच जलाशये आपल्या पूर्ण क्षमतेने भरली आहेत. माजलगाव, गेवराई, बीड यांसह काही तालुक्यांमध्ये काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून, बहुतांश भागात अजूनही पाऊस सुरू आहे तसेच काही तालुक्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.बिंदुसरा धरण ही 100% भरले असुन ते ओव्हरफ्लो झाले आहे. या पाणीपातळीत केव्हाही वाढ होऊ शकते ,या पार्श्वभूमीवर प्रकल्प व नदी काठच्या नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी असे आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले.
जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे प्रकल्प आपल्या पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यात माजलगाव धरण, बीड मतदार संघातील डोकेवाडा, करचुंडी, बिंदुसरा, खटकळी तलाव यांचा समावेश होतो. शिवाय नद्यांनाही पूरपरिस्थिती आहे. जिल्ह्यातील काही भागांना पुराचा फटका बसलेला आहे. यात खरीप पिकांचे व फळबागांचेही नुकसान झाले आहे. त्या सर्व नुकसानीची पाहणी करून तातडीने नुकसानभरपाई मिळेल यासाठी पाठपुरावा करेन असेही यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी " हवामान खात्याने अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रकल्प व नदीकाठच्या नागरिकांनी तसेच जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे." असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा