Subscribe Us

header ads

नगर जिल्ह्यात चोरी प्रकरणी बीड येथून एकाला अटक

अहमदनगर/राशीन-करमाळा रस्त्यावरील राहुल जांभळकर यांचे दुकान फोडून पावणेचार लाखांच्या तांब्याच्या जुन्या व नव्या वायरी चोरणाऱ्या चोरांचा राशीन पोलिसांनी सलग दहा दिवस तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. या प्रकरणी बीड येथील तीन आरोपी निष्पन्न करून त्यातील एकास अटक केली आहे. त्यांच्याकडून ७५ हजारांची 147 किलो तांब्याची वायर आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी जप्त केली.या बाबत सविस्तर माहिती अशी की, 28 ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास राशीन-करमाळा रस्त्यावरील राहुल जांभळकर यांचे दुकान फोडून तीन लाख ऐंशी हजार रुपयांच्या तांब्याच्या जुन्या व नव्या वायरी तीन अज्ञात चोरांनी चोरून नेल्या होत्या.

या बाबत राहुल जांभळकर यांनी राशीन पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलिस हवालदार तुळशीदास सातपुते, सागर म्हेत्रे, गणेश ठोंबरे, भाऊसाहेब काळे, संपत शिंदे, गणेश भागडे यांचे तपास पथक तयार करून त्यांना तपासाच्या योग्य सूचना दिल्या. त्यानंतर सीसीटीव्ही चेक केले असता संबंधित आरोपी राशीन-करमाळा, जामखेड, पाटोदा, मांजरसुंबा मार्गे बीडकडे गेल्याचे निष्पन्न झाले.गुन्ह्यात वापरलेली चार चाकीचा शोध घेऊन बीडच्या मोमिनपुरा येथून सराईत गुन्हेगार सोयब कमरोद्दीन शेख (वय-26) यास अटक केली आहे. त्याचे दोन सहकारी फारुख शेख व सलमान शेख हे फरार आहेत. या तीनही आरोपींवर बीड पोलिसात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती राशीन पोलिसांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा