Subscribe Us

header ads

परळी- अंबाजोगाई महामार्ग वाहतुकीसाठी बंद


परळी /प्रतिनिधी-:जिल्ह्यात झालेल्या पावसाने रस्त्यांची वाताहत झाली आहे. परळी- अंबाजोगाई महामार्गाचे काम सुरु असून  वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी सांगितले आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या कामानिमित्त परळी-अंबाजोगाई मार्गावरील कन्हेरवाडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या पुलाजवळील वळण रस्ता व तात्पुरता पुलावरून पाणी वाहत असल्याने परळी-अंबाजोगाई मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे व त्यांचे सहकारी भर पावसात घडनास्थळी परिस्थिती हाताळत आहेत. बीड जिल्ह्यात पावसामुळे छोट्या नद्या नाले यांना पूर आल्याने  अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर पूले पाण्याखाली गेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक