Subscribe Us

header ads

पेठ बीड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 75 लक्ष रूपयांच्या इमारत बांधकामाचे भूमिपुजन पेठ बीडच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशिल राहिल -आ.संदिप भैय्या क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी):- शहरातील पेठ बीड भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 75 लक्ष रूपयांच्या इमारत बांधकामाचे भूमिपुजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. अनेक दिवसापासून पेठ बीड भागातील नागरीकांची रूग्णालय उभारणीची मागणी होती ती या निमित्ताने पुर्ण होत आहे. या भागातील नागरिकांना सर्व सुविधा मिळून देण्यासाठी व विकासा करण्यासाठी कटीबद्ध आहे असे प्रतिपादन आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांची विशेष उपस्थिती होती.महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नगर पालिका क्षेत्रातील पेठ बीड येथे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून 75 लक्ष रूपयांचा निधी मंजुर झाल्यानंतर या इमारत बांधकामाचे भूमिपुजन माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल, आसाराम भाऊ गायकवाड, अशोकभाऊ वाघमारे, जयम्हलार बागल,खुर्शीद आलम यांच्यासह या भागातील नागरिक, कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी या भागातील विनोद हातागळे, बहिरवाडीचे सरपंच बाजीराव बोबडे, सुशिल जाधव, वाघमारे ताई, विद्याताई जाधव, सुशिल जाधव, शोएब इनामदार यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर म्हणाले की, आरोग्य केंद्राची इमारत उभारल्यानंतर आरोग्याच्या सुविधा या भागातील नागरीकांना मिळण्यास मोठी मदत होईल. या पुढेही पेठ बीडच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणत विकास कामे दर्जेदार करण्यासाठी प्रयत्नशिल राहिल अशी ग्वाही यावेळी दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा