Subscribe Us

header ads

परळी सुन्न आहे! मान खाली गेली राज्याची”, करुणा शर्मा घटनेवर पंकजा मुंडेंच ट्विट!

बीड। करुणा शर्मा (मुंडे) या बीडमध्ये येऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर मात्र परळी येथे मोठा गदारोळ झालेला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे.  करुणा शर्मा या परळीच्या वैधनाथाचे दर्शन घेऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं होतं, त्यानंतर परळीत गदारोळ झाला. करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल आढळली त्यानंतर करुणा शर्मा यांना अटक झाली, त्यानंतर पुन्हा करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवली गेली असे व्हिडिओ समोर आले, या सगळ्या घटनाक्रमानंतर आता भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपलं मौन सोडत नाराजी व्यक्त केली आहे.

पंकजा मुंडे यांचं ट्विट

अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो.शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये,wrong president should not be set!ही काळाची गरज आहे,परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची ! असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या भावावर नाराजी व्यक्त केल्याचं पहायला मिळत आहे.

 काय आहे प्रकरण?

परळी येथे येऊन धनंज मुंडे यांच्याविरोधातील पुरावे पत्रकार परिषदेत देणार असल्याचे करुणा शर्मा यांनी जाहीर केले होते. त्यानुसार, त्या दुपारी परळीमध्ये आल्या. त्यांनी सुरुवातीला वैद्यनाथ देवस्थानच्या पायरीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलांच्या जमावाने त्यांना घेराव घातला. ‘धनंजय मुंडे यांची बदनामी का करत आहात,’ असा जाब विचारत या महिलांनी त्यांना अडवले. त्या वेळी महिलांबरोबर त्यांची शाब्दिक चकमक झाली. जमावाने त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्नही केला. तर, तुम्ही पैसे घेऊन मला विरोध करत आहात, असा आरोप करत करुणा शर्मा यांनी मारहाण केल्याची तक्रार विशाखा घाडगे व गुड्डी तांबोळी या दोन महिलांनी पोलिसांत दिली. त्यावरून, करुणा शर्मा यांच्यासह दोघांविरुद्ध परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तोंडाला रुमाल बांधलेला एक जण गर्दीतून गाडीच्या मागील बाजूला काही तरी टाकत असल्याचा व्हिडिओ

हस्तक्षेप करत करुणा शर्मा यांना शहर पोलिस ठाण्यात नेले. याच काळात त्यांच्या गाडीमध्ये पिस्तुल सापडले आणि खळबळ उडाली. गाडीत सापडलेल्या पिस्तुल प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत. तर, हे पिस्तुल आपले नसून, अडचणीत आणण्यासाठी हे पिस्तूल गाडीत टाकले असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे. दरम्यान, तोंडाला रुमाल बांधलेला एक जण गर्दीतून गाडीच्या मागील बाजूला काही तरी टाकत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याची चर्चा आहे. त्यामुळे, या प्रकरणातील गुंतागूंत वाढली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा