Subscribe Us

header ads

चव्हाण यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकाप आंदोलन करणार


बीड प्रतिनिधी_ बीड  उपप्रादेशीक परिवहन अधिकारी कार्यालयाला उप परिवहन अधिकारी म्हणून जयंत चव्हाण हे गेल्या एक महिन्यापासून रूजू झाले आहेत. रूजू झाल्यापासून ते धडाचे काम करत नाहीत,उलट वाहन धारकांना त्रास देण्याचे काम करत आहेत. वाहन धारकांना धमकावले जात आहे अशा निष्क्रीय आणि वाहन धारकांना धमकावणार्‍या अधिकार्‍याविरोधात कारवाई करण्यात यावी नसता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे ऍड.भाई राजेंद्र नवले, भाई शेख राजु यांनी दिला आहे.निवेदनात म्हटले आहे की, जयंत चव्हाण हे एक महिन्यापासून बीड येथे रूजू झाले आहे. बीडला आल्यापासून त्यांनी एकही व्यवस्थित काम केले नाही. त्यांच्या कॅबिनमध्ये वाहन धारक गेल्यास त्यांना ते व्यवस्थित बोलत नाहीत. वाहन धारकावर ३५३ चा गुन्हा दाखल करण्याचे धमकावत आहेत. जर एखादे वाहन ऑनलाईन होत नाही अशी विचारना केली असता त्यांना सांगतात की, पीसी ऑफिस मुंबईचा आदेश आल्यानंतर वाहन ऑनलाईन होतील व अशा प्रकारचा कोणता आदेश किंवा जीआरटीसी ऑफिसकडून आला आहे का? असे त्यांना विचारना केली तर त्यावेळी ते वाहन धारकांचा अपमान करतात. चव्हाण यांनी आत्तापर्यंत एकाही वाहन धारकाचे काम केले नाही. उलट वाहन धारकांना टॅक्स भरा म्हणून नोटीस देत आहेत. या मनमानी कारभाराला आळा घालण्यात यावा नसता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरा उपोषणाला बसण्याचा इशारा भाई नवले, शेख राजु, गणेश मस्के यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा