Subscribe Us

header ads

शेतकऱ्यांच्या पिकांना खर्चापेक्षा ५० टक्के जास्त भाव मिळायला पाहीजे--- ज्ञानेश्वर सुरवसे ;खापरवाडी येथे स्वामीनाथन आयोग अभ्यास कार्यशाळा संपन्न

वडवणी : वार्ताहार_ सदर कार्यशाळेत शेतकऱ्यांच्या पिकांना किती भाव मिळायला हवा आणि त्याचे मोजमाप काय असावे, आयोगातील इतर तरतुदी व शिफारशी काय आहेत हे युवा प्रगतसिल शेतकरी आदर्श देवगावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर माऊली सुरवसे यांनी  स्वामीनाथन आयोग अभ्यास कार्यशाळेत सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.अष्टपैलू ग्रुप आयोजित खापरवाडी येथे शुक्रवार दि.२४ सप्टेंबर २०२१ रोजी देवगावचे माजी सरपंच, ऊस उत्पादक, संशोधक आणि स्वामिनाथन आयोगाचे अभ्यासक आदरणीय ज्ञानेश्वर माऊली सुरवसे यांची स्वामिनाथन आयोगावर १ तासाची कार्यशाळा सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली होती, या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून परडी माटेगावचे युवा सरपंच माधव शेंडगे हे उपस्थित होते.पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जादा भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, आणि तो आधारभूत हमीभाव देताना उत्पादन खर्चाचा हिशोब लावताना कौटुंबिक मजुरांचा खर्च उत्पादन खर्चात पकडावा, खर्च पकडताना तो कमीत कमी मनरेगा च्या धर्तीवर तरी पकडावा, शेतकरी जी जमीन कसतो त्याच भु भाडं देखील उत्पादन खर्चात असावं आणि ठिबक, शेतीअवजारे व अन्य वस्तू जो शेतकरी शेतीसाठी वापरतो त्याचा घसारा देखील उत्पादन खर्चात लावावा आशा स्वामिनाथन आयोगातील शिफारशी माऊली  शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या.तसेच कार्यशाळेत पुढे बोलताना त्यांनी भूमीसुधार कायदा शिफारस, समग्र सिंचन शिफारस, स्वामींनाथन आयोग स्थापन केल्यापासून आतापर्यंत जो काही हमीभावाचा बॅकलॉग आहे तो देखील शेतकऱ्यांना मिळायला हवा अशी भूमिका घेतली तसेच पीक विमा हा खाजगी कंपनीला न देता त्यासाठी सरकारी कंपनी हवी, पीक कर्ज वसुली पिकाच्या झालेल्या उत्पादन आणि नुकसानी वर ठरवावी आणि शेतकऱ्यांना एका ठराविक वयानंतर पेन्शन मिळावी असे ज्वलंत मुद्दे मांडले.
 कार्यक्रमासाठी ख.लिंबगाव, देवडी, चिंचवडगाव, लउळ, देवगाव, चिंचोटी, हरिश्चंद्र पिंपरी, कवडगाव, मोरेवाडी, पिंपरखेड, खापरवाडी, परडी-माटेगाव, काडीवडगाव, वडवणी,बाहेगव्हान, इंगळे वस्ती व आसपासच्या तांड्यावरील अष्टपैलू मित्र परिवारातील तरुण शेतकरी, पत्रकार, विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन गोकुळ माने यांनी केले तर आभार रामेश्वर पांडुरंग बापमारे यांनी केले.
               
शेतकऱ्यांनी आणि शेतीपुत्रांनी बोलत झालं पाहिजे--- ॲड माधव शेंडगे

आपला पारंपारीक शेती व्यावसाय आसो युवकांचा कोणताही व्यावसाय आसो त्या माध्यमातुन आपले मुद्दे मांडायला शिकावं आणि गावा गावात जाऊन स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी विषयी व्यापक जनजागृती करावी असे आवाहन सरपंच ॲड माधव शेंडगे यांनी १० खेड्यातील उपस्तिथ युवकांना बोलताना केले व आयोगाच्या शिफारशी ह्याच आपल्या उन्नतीचे प्रवेशद्वार ठरेल अशी आशा व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक