Subscribe Us

header ads

आ.संदीप भैय्या क्षिरसागर यांनी पोखरीच्या काळे कुटूंबाला दिला आधार ! पावसात घर गेलं वाहून,जीवन आवशयक वस्तू,संसार उपयोगी साहित्य दिलं भेट

घाटसावळी (प्रतिनिधी):- मुसळधार पावसात घर वाहून गेलं, सारा संसार मोडून पडला,आ .संदीप भैय्या क्षिरसागर यांना या घटनेची माहिती मिळताच संसार उपयोगी साहित्य, जीवन आवशयक वस्तू देत सदर कुटुंबाला आधार दिली.त्याच बरोबर शासनाची सर्वोप्तरी मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी गव्ही आ. संदीप क्षीरसागर यांनी दिली.बीड तालुक्यातील अनेक गावात मुसळधार पावसाने पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, घरांची पडझड झाली. याची पाहणी करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, बीडचे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर,माजी आ. सुनील धांडे,व महसूल, कृषी विभागातील अधिकारी बकरवडी,घटसावळी, पोखरी परिसरात आले होते. पोखरी येथील शेतकरी रामभाऊ काळे यांचे पावसात घर वाहून गेले असल्याने त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.आ संदीप क्षीरसागर यांनी शासनाची मदतही मिळेल तो पर्यंत शक्य असेल तेवढि मदत आपल्याला मिळेल असे सांगितले.त्यानंतर संध्याकाळी लगेच संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर, प्रकाश ठाकुर,दादासाहेब लांडे,उत्रेश्वर सोनवणे,राधाकिसन म्हेैत्रे,राजेंद्र पवार,चौरंगनाथ पवार,राजु मुळे,शिवाजी गोंडे,तेजाब चव्हाण,आनंद हुंबे,ज्ञानेश्वर जाधव ,दिलीप वाणी,रवी मुंजाळ, आण्णासाहेब सुरवसे,प्रतिम शिंदे,दया पवार,दत्ता घोरड,राम फड,शिवाजी मुंडे,परमेश्वर काकडे,गुडाकांत घुमरे,मच्छिंद्र काळे,रमेश लंगरे,भारत फड,गोरख फड,राजेंद्र घोरड'नितीन खोटे,महेश पोपळे,प्रसाद घुमरे,लिंबाजी गाडे,आण्णा ढेपे,बिभिषण डोईफोडे,नितीन खांडे  या प्रमुख कार्यकर्त्यासहीत शेतकरी गावोगावी उपस्थित होते. यावेळी आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांच्या सुचनेवरुन पोखरी येथील घर,संसार वाहुन गेलेल्या रामभाऊ धोंडीबा काळे आणि घाटसावळी येथील कलावती शेषराव फड यांना संसार उपयोगी सर्व भांड्यासहीत किराणामाल सबंधितांना रात्रीतुन त्या कुटुंबीयांना भाऊसाहेब डावकर,प्रकाश ठाकुर,दादासाहेब लांडे,राजेंद्र पवार,तेजाब चव्हाण,अर्जुन काळे यांनी पोहोच केले.तेंव्हा सबंधित कुटुंबीयांनी आ.संदीपभैय्यांनी दिलेला आधार आम्ही विसरणार नाहीत  अशा शब्दात आभार व्यक्त केले.

नाळवंडी सर्कल मध्ये नऊ गावाचा दौरा रस्ते,पुल,तलाव दुरुस्ती सूचना

आ.संदीपभैय्या क्षीरसागर,मा.आ.सुनिल धांडेसर,मा.आ.सय्यद सलीम यांनी नाळवंडी सर्कलमधील नऊ गावाचा दौरा केला.शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन अडिअडचणी जाणुन घेतल्या .पिकांचं ,भाजीपाल्याच झालेले नुकसानीची पहाणी केली.कोठे जमिनी वाहुन गेल्या आहेत,कोठे शेतात जाणारे रस्ते वाहुन गेले आहेत.कोठे पुलं खचले आहेत तर शेतकर्‍यांच्या शेळया,जनावरे मृत्युमुखी पडलेले आहेत.या सर्वांचे पंचनामे करा असे पण आमदार संदीपभैय्यांनी सबंधित अधिकार्‍यांना अदेशित केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा