Subscribe Us

header ads

इनामी बोगस खालसा प्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल पाच आरोपी अटक; एक आरोपी फरार इनामी बोगस खालसा प्रकरणी दुसरा गुन्हा नोंद ग्राऊंड रिपोर्टींगच्या पाठपुराव्याचा परिणाम, भूमाफियांचे धाबे दणाणले आता मुख्य सुत्रधार पोलीसांच्या तावडीत येण्याची शक्यता

बीड । दिव्य रिपोर्टर गेल्या सहा महिन्यांपासून बीड येथील प्रसिद्ध सायं.दैनिक रिपोर्टरच्या माध्यमातून ग्राऊंड रिपोर्टींग या सदराखाली ग्राऊंड रिपोर्टींगचे प्रतिनिधी तथा दिव्य आधारचे संपादक शेख रिजवान यांनी देवस्थान इनामी जमीन व वक्फ इनामी जमीन संदर्भात पाठपुरावा करून बोगस खालसा प्रकरण उघडकीस आणले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी 2018 साली व त्यानंतर झालेले सर्व फेर रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतरही या संदर्भात काही खालसा करणारे अपिलमध्ये गेल्यानंतर अद्यापही फेर रद्द झालेले नव्हते. तसेच आष्टी तालुक्यातील चिचपूर व रुईनालकोल या दोन गावात मोठ्या प्रमाणात इनामी जमीन खालसा झाल्याची ग्राऊंड रिपोर्टींगच्या माध्यमातून समोर आले होते. या प्रकरणी आष्टी पोलीस विविध प्रकारे तपास करत असताना यापूर्वी चिंचपूर येथे बोगस खालसा प्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला होता. विशेष म्हणजे न्यायालयाने चिंचपूर प्रकरणातील आरोपींची जामीनही फेटाळली होती. या प्रकरणी अ‍ॅड.अजहरअली यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे दिसून आले. तसेच जिल्हा वक्फ अधिकारी अमीन जमा व सामाजिक कार्यकर्ते मौलाना अजीम यांनी गुन्हा दाखल संदर्भात आष्टी पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. त्यानंतर रुईनालकोल प्रकरणात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून आष्टी पोलीसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे तर एक आरोपी फरार असल्याची माहिती दिव्य आधारच्या हाती लागली आहे. आता जिल्ह्यातील भूमाफियांचे धाबे दणाणले असून बोगस खालसा करणार्‍यांची आता पंचायत सुरू झाली आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, रुईनालकोल गावातील शेख दस्तगीर व त्यांच्या भावकीतील अनेकांची शेख महमंद बाबा दर्गाहच्या सेवेसाठी खिदमतमाश म्हणून ही जमीन प्रदान करण्यात आली होती. कित्येक वर्षापासून शेख कुटुंबीय दर्गाहची देखभाल करून स्वत:ची उपजिविका इनामी जमीनवर भागवित होते. परंतु अचानकच शंभर एक्कर जमीन खालसा झाल्याची बाब शेख कुटुंबीयांना कळाली. बोगस खालसा झाल्याची बाब समोर आल्यानंतर शेख कुटुंबीयांनी विविध तक्रारी दिल्या पंरतु न्याय मिळाला नाही. यासंदर्भात शेख कुटुंबीयांनी थेट ग्राऊंड रिपोर्टर शेख रिजवान यांना वरील माहिती दिल्यानंतर तसेच ग्राऊंड रिपोर्टींगच्या माध्यमाने अनेक इनामी जमिनी बोगस झाल्याची बाब रिपोर्टरने समोर आणल्यानंतर शेख कुटुंबीयांनीही आपले प्रश्न माध्यमातून मांडले. याची दखल घेत थेट 2018 साली घेण्यात आलेले शेडके खालसा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.  आदेश दिल्यानंतरही पोलीस तपास संथ गतीने सुरू होता. या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांनी विशेष लक्ष दिले. एपीआय मोरे यांची या प्रकरणी नियुक्ती करण्यात आली. कदाचित राजकीय दबाव असेल म्हणून या प्रकरणी गुन्हा दाखल होत नव्हता. शेवटी ग्राऊंड रिपोर्टींगच्या माध्यमाने पाठपुरावा सुरू ठेवून अखेर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकरणी पोलीसांनी पाच आरोपी ताब्यात घेतले असून आता बोगस खालसा करणारा मुख्य सुत्रधार पोलीसांच्या तावडीत आल्याशिवाय राहणार नाही यात काही शंका नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा