Subscribe Us

header ads

डेपो मॅनेजरला 15 हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले;

बीड स्पीड न्यूज 

गेवराई_ येथील आगार प्रमुखाला तक्रारदाराकडून 15 हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले आहे. हि कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नवीन बसस्थानकालगत असलेल्या एका हाँटेलमध्ये कारवाई केली आहे. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान मागील काही वर्षापासून गेवराई येथील अधिकारी एकामागोमाग एक लाचलुचपतच्या जाळ्यात अडकताना दिसत असून आजच्या कारवाईने तालुक्यातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे. श्रीनिवास वागदरीकर असे लाच घेणाऱ्या आगारप्रमुखाचे नाव आहे.गेवराई येथील आगार व्यवस्थापक श्रीनिवास वागदरीकर यांनी या आगारातील भांडारपाल यांच्याकडे तुझा स्टोअरचा रिपोर्ट करणार नाही, म्हणून तीस हजार रुपयाची लाच मागीतली होती. यानंतर तडजोडीअंती 15 हजार देण्याचे ठरले. दरम्यान याबाबत तक्रारदार यांनी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वागदरीकर यांची तक्रार केली होती. याबाबत लाचलुचपत विभागाकडून पडताळणी केली असता वागदरीकर हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बसस्थानकालगत असलेल्या गिरी यांच्या हाँटेलमध्ये सापळा रचून वागदरीकर यांना 15 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात कारवाईची प्रक्रीया सुरू आहे. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई  औरंगाबाद परिक्षेत्रातील सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, राजेंद्र जोशी, मिलिंद इप्पर, 
एवलसिंग हुसुंगे यांनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा